शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत 'गुढीपाडव्या'ला हिंदू एकतेचे दर्शन घडवत निघणार 'स्वागतयात्रा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 12:54 IST

गेल्या १८ वर्षांत या स्वागतयात्रेमध्ये १५० हून अधिक संस्था, चित्ररथ सहभागी झाले. त्याचा आढावा घेण्यात आला. यावर्षी या स्वागत यात्रेत पंधरा ते वीस नवीन संस्था सहभागी होणार आहेत. यात्रा जल्लोषात व मोठ्या दणक्यात निघेल, आपण सारे हिंदू एक आहोत याचे दर्शन घडेल, अशी विराट यात्रा काढण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

रत्नागिरी : श्री देव भैरी जुगाई, नवलाई, पावणाई, तृणबिंदूकेश्वर संस्था आणि श्री पतितपावन मंदिर संस्था यांच्या माध्यमातून २ एप्रिलला हिंदू एकतेचे दर्शन घडवत हिंदू नववर्ष स्वागतयात्रा जल्लोषात काढण्यात येणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशभूषेत रत्नागिरीकर हिंदू मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सुमारे ७५ संस्थांचे चित्ररथ, वाहने, ढोल, ताशापथके सामील होणार आहेत. यासंदर्भात रत्नागिरीतील पतितपावन मंदिर संस्थेत बैठक झाली.या बैठकीला भैरी देवस्थान संस्थेचे अध्यक्ष रवींद्र सुर्वे, उपाध्यक्ष राजन जोशी, पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेश शिंदे, नववर्ष स्वागत यात्रेचे संयोजक आनंद मराठे, पतितपावनचे माजी अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर, कॅप्टन कोमल सिंग, मोहन भावे, संतोष पावरी, सुधाकर सावंत, मुकुंद जोशी, यांच्यासमवेत सुमारे १०० पुरुष, महिला भगिनी उपस्थित होत्या.पुढील बैठक २९ मार्चला सायंकाळी ५.३० वाजता पतितपावन मंदिरात आयोजित केली आहे. तसेच स्वागतयात्रा प्रचारासाठी दुचाकी फेरीचे नियोजन करण्यात येत आहे. स्वागतयात्रेत गुलाल उधळला जाणार नाही. हिंदू बांधव आपापल्या परिसरात सजावट, रस्त्यावर रांगोळी काढून स्वागत करणार आहेत.गेल्या १८ वर्षांत या स्वागतयात्रेमध्ये १५० हून अधिक संस्था, चित्ररथ सहभागी झाले. त्याचा आढावा घेण्यात आला. यावर्षी या स्वागत यात्रेत पंधरा ते वीस नवीन संस्था सहभागी होणार आहेत. यात्रा जल्लोषात व मोठ्या दणक्यात निघेल, आपण सारे हिंदू एक आहोत याचे दर्शन घडेल, अशी विराट यात्रा काढण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.श्री भैरी मंदिरातून ९.३० वाजता यात्रेला सुरुवात हाेणार आहे. त्यानंतर श्री देव भैरी, खालची आळी, मुरलीधर मंदिर, विठ्ठल मंदिर, गोखले नाका, मारुती आळी, जयस्तंभ, राम आळी, राधाकृष्ण नाका, गोखले नाका, गाडीतळ मार्गे पतितपावन मंदिरात सांगता होईल. मारुती मंदिर येथूनही सकाळी ९.३० वाजता स्वागतयात्रा निघेल आणि ही यात्रा मूळ स्वागतयात्रेत जयस्तंभ येथे सामील होईल.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी