शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमान हा केवळ तिघांचा पक्ष : विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 23:28 IST

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा केवळ तिघांचा म्हणजेच राणे कुटुंबीयांचा पक्ष आहे. त्यामध्ये कुणी कार्यकर्तेच नाहीत, अशा शब्दांत खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या टीकेचा समाचार घेतला.

ठळक मुद्देखंडाळा येथील मेळाव्यात नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र

गणपतीपुळे : महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा केवळ तिघांचा म्हणजेच राणे कुटुंबीयांचा पक्ष आहे. त्यामध्ये कुणी कार्यकर्तेच नाहीत, अशा शब्दांत खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या टीकेचा समाचार घेतला.

खासदार नारायण राणे यांची काही दिवसांपूर्वी नजीकच्या खंडाळा येथे सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती, त्याच गावात शिवसेनेचा शनिवारी सायंकाळी मेळावा झाला. या मेळाव्यात खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, ज्यांनी पैसे घेऊन ‘स्वाभिमान’मध्ये प्रवेश केला असेल, त्यांनी आपले हात पाय, बोटे, मान सांभाळावेत.

कुटुंब पहिले की पैसा याचा विचार करावा. नारायण राणे यांनी एकदा शिवसेनेकडून पराभवाची धूळ चाखलीच आहे, परंतु त्यांची अजूनही हिम्मत असेल, तर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान राऊत यांनी दिले.कोणत्याही फुट्या-दीडफुट्यांना उत्तर देण्यासाठी ही सभा आयोजित केलेली नाही, तर ही लोकांशी हितगुज करण्यासाठी आयोजित केलेली सभा आहे, असे ते म्हणाले.

सिंधुदुर्गात आतापर्यंत नऊ जणांचा बळी गेला, तो कुणी घेतला? याचा हिशेब चुकता करण्याची आणि जाब विचारण्याची वेळ आली आहे, असेही राऊत यांनी सांगितले. ज्यांची मतदारांनीच सिंधुदुर्गातून हकालपट्टी केली, तो त्याच्या कर्मानेच मरणार, आता राणे यांची सत्ता संपुष्टात येण्याची वेळ आली आहे. विधानसभा निवडणुकीत राणे यांची उरलीसुरली सत्ताही संपुष्टात येईल, असे ते म्हणाले.

या मेळाव्याला आमदार उदय सामंत, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, प्रकाश साळवी, विलास चाळके, उद्योजक भैया सामंत, माजी सभापती प्रकाश रसाळ, बाबू म्हाप, गजानन पाटील, आदी उपस्थित होते.हे काय मला पराभूत करणार?मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी रत्नागिरीत आले होते. तरीही भाजप उमेदवार माझा पराभव करू शकला नाही, तेथे ‘हे’ माझे काय करणार? अशा शब्दांत आमदार आणि ‘म्हाडा’चे अध्यक्ष उदय सामंत यांनी नाव न घेता नारायण राणे यांच्यावर हल्ला केला.

टॅग्स :PoliticsराजकारणVinayak Rautविनायक राऊत ElectionनिवडणूकRatnagiriरत्नागिरी