शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी कारवायात सहभाग असल्याचा संशय, एटीएसने रत्नागिरीतून एकाला घेतले ताब्यात

By अरुण आडिवरेकर | Updated: July 27, 2023 17:35 IST

कसून चौकशी सुरु

रत्नागिरी : दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून कोथरुड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दोन अतिरेक्यांना अटक केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) रत्नागिरीतील एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे पुढे आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे एटीएसच्या नवी मुंबई युनिटने ही कारवाई केली आहे. त्याची कसून चौकशी सुरु असून, या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे आढळल्यास त्याच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे.पुण्यात दुचाकीचोरीच्या प्रकरणात अटक केलेल्या मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युसुफ या दोन संशयितांचा दहशतवादी कटात सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यांना ५ ऑगस्टपर्यंत एटीएस काेठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, त्यांचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला हाेता. हे दोघे १५ महिन्यांपासून पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते. या दाेघांची चौकशी केली असता अनेक नावे समोर आली आहेत. दरम्यान, महाराष्ट्र एटीएसने अलीकडेच पुण्यात अटक केलेल्या दोन संशयित दहशतवादी प्रकरणाचा तपास हाती घेतला. तपासादरम्यान दोघांच्या चौकशीतून आणखी काही लोकांची नावे समोर आली आहेत. त्यानंतर एटीएसच्या पथकाने अनेकांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.या तीनही दहशतवाद्यांनी राजस्थानमधील जयपूर इथे घातपात करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) त्यांचा शोध घेत होती. एनआयएने तिसऱ्या संशयितावर पाच लाखाचे इनामही जाहीर केले आहे. दरम्यान, पुणे पाेलिसांनी ताब्यात घेतलेल्या दाेघांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी कारवाईत रत्नागिरीतील एकाचा समावेश असल्याची माहिती एटीएसला मिळाली आहे. त्यानुसार पाेलिसांनी रत्नागिरीतून एकाला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चाैकशी सुरू असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीterroristदहशतवादी