शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नसल्याचा अभिमान : सुमित्रा महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 16:44 IST

कोकणातील माणस ही कष्टकरी आहेत. भले गरिबीत राहत असतील मात्र कोकणातील शेतकरी मात्र कधी आत्महत्या करत नाही. परिस्थितीतून मार्ग काढण्याची ताकद कोकणच्या माणसामध्ये आहे. म्हणून देशाच्या संसदेत काम करताना एक माहेरवाशीण म्हणून मला याचा सार्थ अभिमान आहे, असे उद्गार गुहागरमध्ये श्री व्याडेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या देशाच्या लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी काढले.

ठळक मुद्देकोकणातील शेतकरी आत्महत्या करत नसल्याचा अभिमान : सुमित्रा महाजन गुहागर येथील व्याडेश्वर मंदिराला भेट

गुहागर : कोकणातील माणस ही कष्टकरी आहेत. भले गरिबीत राहत असतील मात्र कोकणातील शेतकरी मात्र कधी आत्महत्या करत नाही. परिस्थितीतून मार्ग काढण्याची ताकद कोकणच्या माणसामध्ये आहे. म्हणून देशाच्या संसदेत काम करताना एक माहेरवाशीण म्हणून मला याचा सार्थ अभिमान आहे, असे उद्गार गुहागरमध्ये श्री व्याडेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या देशाच्या लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी काढले.त्या पुढे म्हणाल्या की, कोकणातील तरुणांनी आता पुढे येऊन काम करण्याची गरज आहे. कोकणचा विकास करायचा असेल तर सर्व पक्ष जात भेद बाजूला ठेवून तुम्ही एकत्र या. त्यासाठी देशाच्या पातळीवर जे सहकार्य माझ्या कोकणासाठी लागेल ते मी देण्यास तयार आहे, असे अभिवचन देतानाच त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या, असे सांगितले. निवडणुका जवळ आल्या असल्या तरी सुध्दा मी येणाऱ्या सरकारच्या काळात सुध्दा कोकणासाठी प्रयन्न निश्चितच करेन, असे सांगितले.त्या पुढे म्हणाल्या की, कोकणच्या विकासासाठी संघटित व्हा, इंदोरमध्ये मी काम करण्यास सुरूवात केली. तेव्हा दळणवळण फार कमी होते. आपल्या राज्याला, जिल्ह्याला, तालुक्याला देशाला जोडायचे असेल तर वाहतुक व्यवस्था होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. आज इंदोरमध्ये रेल्वे, हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणात आहेत. माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये सर्वात महत्वाचे निर्णय मी दळणवळणाच्या बाबतीत घेतले आणि म्हणूनच आज इंदोर प्रगतीच्या वाटेवर आहे, असे त्यांनी सांगितले.कोकणात फळप्रक्रिया प्रकल्प उभाराकोकणच्या शेतकऱ्यांनी सुध्दा एकत्र येऊन फळप्रक्रिया प्रकल्प उभे केले पाहिजेत. आज कोकणचा आंबा हा देशात जातो. फणस, काजू यांसारख्या फळांवर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. त्यासाठी लागेल ते सहकार्य करण्यास मी तयार आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी प्रयन्न केले पाहिजेत. एक माहेरवाशीण म्हणून मी नेहमीच तुमच्याबरोबर राहीन, असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.

टॅग्स :Sumitra Mahajanसुमित्रा महाजनRatnagiriरत्नागिरी