शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

राजापूर उपनगराध्यक्षपदी सुलतान ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 15:35 IST

Rajapur Nagar Parishad Ratnagiri-राजापूर येथील नगरपरिषदेच्या रिक्त असलेल्या उपनगराध्यक्षपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नगरसेवक सुलतान ठाकूर यांची निवड झाली आहे. सुलतान ठाकूर यांनी शिवसेनेच्या उमेदवार प्रतीक्षा खडपे यांचा सात विरुद्ध नऊ मतांनी पराभव करत उपनगराध्यक्षपद पटकावले आहे. सुलतान ठाकूर यांना दुसऱ्यांदा उपनगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा बहुमान मिळाला आहे.

ठळक मुद्देराजापूर उपनगराध्यक्षपदी सुलतान ठाकूरराजापूर उपनगराध्यक्षपदी सुलतान ठाकूर

राजापूर : येथील नगरपरिषदेच्या रिक्त असलेल्या उपनगराध्यक्षपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नगरसेवक सुलतान ठाकूर यांची निवड झाली आहे. सुलतान ठाकूर यांनी शिवसेनेच्या उमेदवार प्रतीक्षा खडपे यांचा सात विरुद्ध नऊ मतांनी पराभव करत उपनगराध्यक्षपद पटकावले आहे. सुलतान ठाकूर यांना दुसऱ्यांदा उपनगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा बहुमान मिळाला आहे.काँग्रेसचे सात, राष्ट्रवादीचे एक व भाजपच्या एकमेव नगरसेवक असलेल्या गोविंद चव्हाण यांनी शिवसेनेविरोधात काँग्रेसला मतदान करत ठाकूर यांच्या पारड्यात आपले मत टाकले. राजापूर नगरपरिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असून, आघाडीत ठरलेल्या धोरणांप्रमाणे आपली उपनगराध्यक्षपदाची एक वर्षाची मुदत संपल्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय ओगले यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे या रिक्त झालेल्या पदासाठी मंगळवारी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै सभागृहात ही निवडणूक पार पडली.काँग्रेस आघाडीकडून सुलतान ठाकूर यांनी तर शिवसेनेकडून प्रतीक्षा खडपे यांनी या पदासाठी अर्ज दाखल केले होते. यासाठी झालेल्या मतदानात ठाकूर यांना नऊ तर खडपे यांना सात मते पडली. ठाकूर यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, शिवसेना गटनेते विनय गुरव यांच्यासह माजी आमदार अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे व सर्व नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन केले.ठाकूर हे राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत. गेली दहा वर्षे ते नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी उपनगराध्यक्षपदासह बांधकाम समिती सभापती म्हणून काम केलेले आहे. आता त्यांची दुसऱ्यांदा उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे. राज्यात असलेले महाविकास आघाडीचे सूत्र राजापुरात अजून अस्तित्त्वात आलेली नाही. 

टॅग्स :Rajapur Nagar Parishadराजापूर नगर परिषदRatnagiriरत्नागिरी