शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साखरेच्या ट्रकची लातूर बसला जोरदार धडक,७ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 19:31 IST

accident Ratnagiri- रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावर पाली-नाणीज दरम्यान अपघाताची मालिका सुरुच आहे. साखरेची पोती घेऊन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने रत्नागिरी-लातूर एस.टी. बसला जोरदार धडक दिल्याची घटना नाणीज (ता. रत्नागिरी) येथे सकाळी ८.३० वाजता घडली. या अपघातात बसमधील ७ प्रवाशी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसाखरेच्या ट्रकची लातूर बसला जोरदार धडक७ प्रवासी जखमी

रत्नागिरी : रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावर पाली-नाणीज दरम्यान अपघाताची मालिका सुरुच आहे. साखरेची पोती घेऊन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने रत्नागिरी-लातूर एस.टी. बसला जोरदार धडक दिल्याची घटना नाणीज (ता. रत्नागिरी) येथे सकाळी ८.३० वाजता घडली. या अपघातात बसमधील ७ प्रवाशी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.क्षमतेपेक्षा जास्त साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या अपघाताची मालिका सुरु असल्याने पाली, नाणिज येथील स्थानिक रहिवाशांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात बस आणि ट्रक दोन्ही गाड्या रस्त्यावर पलटी झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.रत्नागिरीहून लातूरला जाणारी बस (एमएच २०, बीएल १२५४) ही सकाळी ७.३० वाजता १५ प्रवाशांना घेऊन निघाली. ही बस नाणीज येथे आली असता साखरेची पोती घेऊन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (एमएच १३, सीयु ४५७६) जोरदार धडक दिली. या जोरदार धडकेने दोन्ही वाहने रस्त्यावर आडवी झाली. या अपघातामुळे कानटळ्या बसवणारा आवाज झाल्याने स्थानिक रहिवाशी घाबरले होते. या अपघातानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. 

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी