शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरच्या समुद्रात बुडणाऱ्या कऱ्हाडच्या तरुणाला वाचविण्यात यश

By अरुण आडिवरेकर | Updated: December 18, 2024 17:46 IST

शृंगारतळी : मित्रांसाेबत समुद्राच्या पाण्यात अंघाेळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असलेल्या कऱ्हाड येथील तरुणाला वाचविण्यात गुहागर नगरपंचायतीच्या ...

शृंगारतळी : मित्रांसाेबत समुद्राच्या पाण्यात अंघाेळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असलेल्या कऱ्हाड येथील तरुणाला वाचविण्यात गुहागर नगरपंचायतीच्या जीवरक्षकाला यश आले. अजित डुंबरे असे या तरुणाचे नाव असून, ही घटना मंगळवारी सायंकाळी गुहागर येथील समुद्रात घडली. केवळ जीवरक्षकाने दाखविलेले प्रसंगावधान आणि तरुणांची मिळालेली साथ यामुळेच तरुणाचे प्राण वाचविण्यात यश आले.

कऱ्हाड येथील अजित डुंबरे हे मंगळवारी आपल्या अन्य ११ मित्रांसोबत गुहागर येथे फिरायला आले होते. सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास गुहागर पोलिस स्थानकाच्या मागील चौपाटीवर ही सर्व मंडळी मौजमजा करत होते. त्यातील काहीजण समुद्रात अंघोळीसाठी उतरले. त्यामध्ये अजित डुंबरेही हाेता. त्याला चांगले पोहता येते. परंतु, तोडलेल्या जेटीशेजारी पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने ताे बुडू लागला. आपला मित्र बुडत असल्याचे कळताच त्याच्या सहकाऱ्यांनी आरडाओरडा केला.त्याचवेळी किनाऱ्यावर असलेल्या संगम मोरे याच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने लगेचच किनाऱ्यावरील नगरपंचायतीचा जीवरक्षक प्रदेश तांडेल यांना माहिती दिली. तांडेल यांनी क्षणाचाही विलंब न लावता रेस्क्यू बोर्ड घेऊन ते समुद्रात गेले. त्यांनी अजित डुंबरे यांना काही क्षणातच किनाऱ्यावर आणले. त्यांना बाहेर काढण्यासाठी निहाल तोडणकर, संगम मोरे, सदाम बागकर या तरुणांनी मदत केली. किनाऱ्यावर येताच अजित डुंबरे यांनी प्रदेश तांडेल आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्गdrowningपाण्यात बुडणेKaradकराड