शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील मोरवणेचे सुपुत्र सुभेदार अजय ढगळे शहीद, सिक्कीम सीमेवर रेकीसाठी गेले असता घडली दुर्घटना

By संदीप बांद्रे | Updated: April 1, 2023 17:52 IST

५ जवान जखमी झाले

चिपळूण : आसाम राज्यातील तैवान येथे चीन सिमेलगत रस्ता तयार करण्यासाठी रेकी करण्यास गेलेल्या जवानाचा दरड कोसळून दुर्देवी मृत्यू झाला. यामध्ये सुभेदार अजय शांताराम ढगळे (वय-३६) हे शहीद झाले आहेत. ते मुळचे चिपळूण तालुक्यातील मोरवणे ढवळेवाडी येथील असून त्यांच्यावर सोमवारी (दि.३) शासकीय इतमामात अत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरवर्षी या हंगामात तैवान येथे बर्फ वितळतो. यावेळी सैनिकी कारवाईसाठी चीनच्या सिमेलगत रस्ता तयार करण्यासाठी रेकी केली जाते. याकामासाठी रेकी करण्यास गेलेले सुभेदार अजय ढगळे व अन्य जवानांवर दरड कोसळली. यामध्ये ६ जण सापडले. त्यातील ५ जवान जखमी झाले. मात्र सुभेदार अजय ढगळे हे ढिगाऱ्याखाली गाडले गेले. २४ मार्च पासून सिक्कीममध्ये सततचा पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे. त्यानुसार भूस्खलन मोठ्या प्रमाणात झाले आहे. रेकी करण्यास गेलेले जवान अजय ढगळे व त्यांच्या टिमला काही कळण्याआधीच दरड कोसळून ते माती व बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यांच्या समवेत असलेले अन्य ५ जण बचावले आहेत. गेले सहा दिवस भारतीय सैन्य सुभेदार अजय ढगळे यांचा शोध घेत होते. अखेर शनिवारी सकाळी शहीद जवान ढगळे यांचा मृतदेह चिखल व दगड मातीखाली सापडला. याबाबतचे वृत्त मोरवणे गावात पोहताच गावावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुली, २ भाऊ, ४ बहिणी असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव सोमवारी आणले जाण्याची शक्यता असून मोरवणे येथील स्मशानभुमीत शासकीय इतमामात अत्यसंस्कार करण्यात येणार आहे..

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsikkimसिक्किम