शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील एका व्हीलचेअरवरच्या लग्नाची गोष्ट...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 18:17 IST

रत्नागिरी जिल्हा पॅराप्लेजिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष सादीक नाकाडे यांची दोन वर्षांपूर्वी एका मेळाव्यात योगेश खाडे (शिरोळ) या दिव्यांग तरूणाशी ओळख झाली.

- मेहरून नाकाडे रत्नागिरी : सनईचे सूर निनादत असतानाच, करवल्यांची मंडपात एकच घाई झाली होती. एवढ्यात मुहूर्ताची वेळ झाल्यावर मंगलाष्टका सुरू केल्या. अक्षता टाकण्यासाठी नवेट गावातील सहदेव एरीम यांच्या मंडपात सर्व धर्मियातील बंधू-भगिनींची गर्दी केली होती. हा विवाह विशेष होता. कारण दोन दिव्यांगांची मने जुळून आली होती अन् मैत्रीचं रुपांतर लग्नबंधनात झाले होते. या आनंद सोहळ्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सुवर्णा व योगेश या दोन दिव्यांग उभयतांचं हे लग्न पाहण्यासाठी वऱ्हाडी मंडळींनी गर्दी केली होती.

रत्नागिरी जिल्हा पॅराप्लेजिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष सादीक नाकाडे यांची दोन वर्षांपूर्वी एका मेळाव्यात योगेश खाडे (शिरोळ) या दिव्यांग तरूणाशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. रत्नागिरी जिल्हा पॅराप्लेजिकल फाऊंडेशनचे सदस्यपद योगेशने स्वीकारले होते, तर सुवर्णा एरीम ही संस्थेची पूर्वीपासून सदस्या होती. पॅराप्लेजिकल संघटनेच्या मेळाव्यासाठी योगेश कोल्हापूरहून रत्नागिरीत आला होता. मेळाव्याचे सूत्रसंचालन सुवर्णाने केले, त्यामुळे मेळाव्यानंतर ओळख झाली. सुवर्णा ही पोलिओग्रस्त आहे तर योगेश पॅराप्लेजिकल आहे. योगेश स्वत: छायाचित्रकार असून, घराजवळच स्टुडिओ आहे. योगेश व सुवर्णाची पुढे चांगली मैत्री झाली.

योगेशने  सुवर्णाबरोबर लग्न करायचे असल्याचे सादिकभार्इंना सांगितले. योगेशच्या घरची मंडळी तयार होती, प्रश्न होता सुवर्णाच्या घरच्या मंडळींचा. परंतु दोघांचे विचार जुळले असल्याने शिवाय रितसर खाडे कुटुंबियांकडून मागणी असल्याने एरिम कुटुंबियांनीही परवानगी दिली. सादीकभाई यांच्या  पुढाकाराने लग्न ठरले. सुवर्णाच्या घरीच लग्न असल्याने तयारीही जोरदार करण्यात आली होती.

शिरोळहून खाडे कुटुंबीय नातेवाईकांसह एक दिवस आधीच नवेट गावी दाखल झाले. शनिवारी साखरपुडा व रविवारी दुपारी ३.१८ मिनिटांनी देवाब्राह्मणाच्या साक्षीने लग्न लागले. व्हिलचेअरवर बसून  उभयतांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले, तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. दोन धडपड्या जीवांचं शुभमंगल अनेकांना आयुष्यात उभं राहण्याचं धडा देऊन गेलं.

नयनी आले आनंदाश्रूसुवर्णा,योगेश या उभयतांना भरभरून आशीर्वाद दिले. रत्नागिरी जिल्हा पॅराप्लेजिकल फाऊंडेशनकडेच यजमानपद असल्याने पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. केवळ उपस्थित न राहिता लग्नाच्या तयारीत त्यांनी हातभारही लावला होता. हा विवाह जुळून येण्यापासून ते तो पार पडेपर्यंत साऱ्याच घटनांना संस्थेचा स्पर्श झाला. मात्र मैत्रीची कहाणी प्रेमात बदलल्याचा आनंद साऱ्यांच्या चेहऱ्यावर तरळला होता.

टॅग्स :marriageलग्न