शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांची पावले कोकणाकडे, पाच जिल्ह्यांमधील निवासस्थानांचे ७० टक्के आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 17:41 IST

tourism, Konkan, Ratnagirinews लॉकडाऊन शिथील होताच कोकणात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येऊ लागले आहेत. पर्यटक निवासासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांना प्रथम पसंती देत असल्याने सध्या कोकण विभागातील पाच जिल्ह्यांमधील निवासस्थानांचे ७० टक्के आरक्षण झाल्याची माहिती विभागीय पर्यटन अधिकारी दीपक माने (कोकण विभाग) यांनी दिली.

ठळक मुद्देपर्यटकांची पावले कोकणाकडेपाच जिल्ह्यांमधील निवासस्थानांचे ७० टक्के आरक्षण

रत्नागिरी : लॉकडाऊन शिथील होताच कोकणात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येऊ लागले आहेत. पर्यटक निवासासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांना प्रथम पसंती देत असल्याने सध्या कोकण विभागातील पाच जिल्ह्यांमधील निवासस्थानांचे ७० टक्के आरक्षण झाल्याची माहिती विभागीय पर्यटन अधिकारी दीपक माने (कोकण विभाग) यांनी दिली.कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर देशातील व्यवहार सुरळीत होण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी गेला. त्यानंतर आता लॉकडाऊन शिथील करण्यात आले असून, पर्यटनस्थळेही खुली करण्यात आली आहेत. मात्र, या कालावधीत पर्यटनच थांबल्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (एम. टी. डी. सी.) सर्व निवासस्थाने बंद होती. त्यामुळे महामंडळाचे करोडो रूपयांचे नुकसान झाले.सप्टेंबर महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये बऱ्याच अंशी शिथिलता आली. त्यामुळे पर्यटनालाही हिरवा कंदील मिळाला. पर्यटकांसाठी पर्यटन महामंडळाने कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, वेळणेश्वर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली, हरिहरेश्वर या पाच ठिकाणची आपली सर्व निवासस्थाने निर्जंतूक करून ठेवली होती. त्याचप्रमाणे येणाऱ्या पर्यटकांच्या तपासणीसाठी ऑक्सिमीटर, थर्मल गन तसेच सॅनिटाईझरची व्यवस्था केली होती.कर्मचाऱ्यांनाही शारीरिक अंतर तसेच कोरोनाच्या अनुषंगाने मास्क, फेसशिल्ड, हॅण्डग्लोव्हज् आणि सॅनिटायझर आदी आवश्यक ती खबरदारी घेण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. त्यांची चाचणीही करण्यात आली. सुरक्षितेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतल्याने आता पर्यटक पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांकडे आकर्षित होऊ लागले आहेत. आताच ७० टक्के आरक्षण फुल्ल झाले असून, ही गर्दी आता ५ जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे.गेल्या आठ महिन्यांपासून घरातच राहिलेले नागरिक आता दोन दिवसांसाठी का होईना पर्यटनासाठी जाण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे सलग दोन दिवसांची सुट्टी मिळताच फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे आता पर्यटन महामंडळाच्या निवासस्थानी गर्दी होऊ लागली असल्याचे विभागीय पर्यटन अधिकारी दीपक माने यांनी सांगितले.ऑनलाईन आरक्षणाची सुविधामहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ऑनलाईन आरक्षणाचीही सुविधा उपलब्ध क़रून दिली आहे. आता प्रत्येक शनिवार आणि रविवार असे दोन दिवस शासकीय कार्यालयांना सुट्टी मिळते. त्यामुळे या सुट्टीचा फायदा घेत, गेले आठ महिने घरातच राहिलेला पर्यटक पर्यटनासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडू लागला आहे.सुट्टीचा फायदा२५ डिसेंबर रोजी नाताळची सुट्टी आहे. या दिवशी शुक्रवार आहे. त्यानंतर शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जोडून सुट्टी आल्याने या सलग तीन दिवसांच्या सुट्टीचा फायदा पर्यटकांना मिळणार आहे.

टॅग्स :tourismपर्यटनkonkanकोकणRatnagiriरत्नागिरी