शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी हंगामातील गर्दीने एसटीला तारले, रत्नागिरी अग्रस्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 11:55 IST

उन्हाळी सुटीमध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा गाड्यांची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली होती. रत्नागिरी विभागाने योग्य नियोजन करून मुंबई विभागात अग्रस्थान प्राप्त केले आहे. गतवर्षी मे महिन्यात २८ कोटी ३३ लाख ४० हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी ३१ कोटी २७ लाख ९९ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत २ कोटी ९४ लाख ५९ हजार रूपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देउन्हाळी हंगामातील गर्दीने एसटीला तारलेराज्य परिवहन महामंडळ : मुंबई विभागात रत्नागिरी अग्रस्थानावर

रत्नागिरी : उन्हाळी सुटीमध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा गाड्यांची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली होती. रत्नागिरी विभागाने योग्य नियोजन करून मुंबई विभागात अग्रस्थान प्राप्त केले आहे. गतवर्षी मे महिन्यात २८ कोटी ३३ लाख ४० हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी ३१ कोटी २७ लाख ९९ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत २ कोटी ९४ लाख ५९ हजार रूपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे.वर्षभरातील दीर्घ सुटीसाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गावी येत असतात. मुंबईकरांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने दि. १५ एप्रिल ते दि. १५ जूनपर्यंत दररोज ४७ मिळून एकूण २७२६ जादा गाड्यांचे नियोजन केले होते. शिवाय दररोज रत्नागिरी विभागातून दररोज १५० गाड्या मुंबई मार्गावर धावत होत्या.एप्रिल महिन्यात रत्नागिरी विभागाचा ६६ लाख ६८ हजार किलोमीटर प्रवास झाल्याने २१ कोटी ६६ लाख ८ हजाराचे उत्पन्न प्राप्त झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत ३ लाख ७ हजार किलोमीटरने प्रवास वाढला. शिवाय ३ कोटी ७१ लाख १७ हजाराने उत्पन्नात वाढले. मुंबई विभागात मुंबई, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी विभाग येतात. सहा विभागात रत्नागिरी विभाग उत्पन्नात प्रथम क्रमांकावर आहे. यावर्षी मुंबई विभागाचे एकूण उत्पन्न ९१ कोटी ७९ लाख १ हजार असून, गतवर्षी ८३ कोटी ७० लाख ११ हजार होते. गतवर्षीच्या तुलनेत ८ कोटी ८ लाख ९० हजार रूपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे.मे महिन्यात रत्नागिरी विभागाने ८३ लाख १३ हजार किलोमीटर प्रवास करून ३१ कोटी २७ लाख ९९ हजाराचे उत्पन्न मिळविले होते. गतवर्षी ८२ लाख १३ हजार किलोमीटर प्रवास करून २८ कोटी ३३ लाख ४० हजार रूपयांचे उत्पन्न लाभले होते. गतवर्षीच्या तुलनेत एक लाख किलोमीटर इतके अंतर वाढले, शिवाय २ कोटी ९४ लाख ५९ हजार रूपयांची उत्पन्नात वाढ झाली.

एप्रिल व मे या दोन्ही महिन्यात पाचही विभागात रत्नागिरी विभाग उत्पन्नात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. यावर्षी मुंबई विभागाचे एकूण उत्पन्न ११४ कोटी ९३ लाख ८४ हजार असून, गतवर्षी १०८ कोटी ८६ लाख २३ हजार होते. गतवर्षीच्या तुलनेत ६ कोटी ७ लाख ६१ हजार रूपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे. रत्नागिरी विभागातील नऊ आगारामध्ये दापोली, खेड व गुहागर आगारांनीदेखील चांगले उत्पन्न मिळविले आहे. 

एप्रिल महिन्यात परीक्षा संपल्यानंतर १५ एप्रिलपासून १६ जूनपर्यंत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे फक्त निवडणुका कालावधीत तीन दिवस उन्हाळी जादा गाड्या बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे तीन दिवसात १४१ जादा गाड्या बंद होत्या. परंतु प्रत्येक आगाराकडून विशेष नियोजन करण्यात आल्यामुळेच रत्नागिरी विभागाने गतवर्षीच्या तुलनेत जादा उत्पन्न मिळविले शिवाय मुंबई विभागातही अग्रस्थानी राहिला आहे.-विजय दिवटे,विभाग नियंत्रक, रत्नागिरी.

टॅग्स :state transportएसटीRatnagiriरत्नागिरी