शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
2
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
3
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
4
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
5
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
6
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
7
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
8
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
9
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
10
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
11
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
12
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
13
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
14
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
15
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
16
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
17
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
18
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
19
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे
20
पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?

कोकणकरांच्या सुखकर प्रवासासाठी एसटी'चे अन्य विभाग दिमतीला; मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूरमधील गाड्या दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 16:25 IST

मार्ग तपासणी/दक्षता पथक तैनात

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबईकर कोकणात दाखल झाले आहेत. मुंबईतून कोकणात उत्सवासाठी येणाऱ्या गणेशभक्तांसाठी राज्य परिवहन महामंडळाने जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांसाठी पाच हजार जादा गाड्या येणार आहेत. दि. २३ ऑगस्टपासून जादा गाड्यांचे आगमन सुरू झाले असून, दि. २६ पर्यंत जादा गाड्या येणार आहेत. उत्सव कोकणातला असला तरी महामंडळातील अन्य विभागांनीही मदतीचे हात पुढे केले आहेत.राज्य परिवहन महामंडळातर्फे दरवर्षी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात येते. मुंबई, ठाणे व पालघर येथून कोकणात पाच हजार जादा गाड्या येणार आहेत. गौरी-गणपतीचा सण साजरा करण्यात आल्यानंतर परतीसाठी दि. २ ते ८ सप्टेंबर या कालावधीत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी गाड्यांची व्यवस्था केली आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी गाड्यांचे नियाेजन करण्यात आले आहे.मार्ग तपासणी/दक्षता पथक तैनातअपहार प्रवृत्तीला आळा बसावा, राज्य परिवहन महामंडळाच्या वैध उत्पन्नास कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होऊ नये यासाठी जादा वाहतुकीवेळी मुंबई ते कोकण मार्गावर २४ तास तपासणी पथके कार्यरत असणार आहेत. त्यासाठी सांगली, सातारा, नाशिक विभागाची पथके मदत करणार आहेत.

देखभाल दुरुस्ती पथकउत्सवासाठी आलेल्या जादा गाड्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी देखभाल पथकांमध्ये किमान १० यांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्येही नाशिक, पुणे, धुळे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर येथील कर्मचारी सहभागी होणार आहेत. एकूण १२ ठिकाणी ही पथके कार्यरत राहणार आहेत.

दुरुस्ती पथकेमुंबईपासून सावंतवाडीपर्यंत एकूण १२ दुरुस्ती पथके उत्सवकाळात कार्यरत राहणार आहेत. दुरुस्ती पथकांमध्ये नाशिक, मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचारी पथके कार्यरत राहणार आहेत. जादा वाहतूक करताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बस नादुरुस्त झाल्यास तातडीने दुरुस्ती करून देण्यात येणार आहे.

बसची उपलब्धताकोकणात एकूण ४,२२३ ग्रुप बुकिंग तर ७७७ ऑनलाइन मिळून एकूण ५,००० जादा गाड्या कोकणात आल्या आहेत. यासाठी अन्य विभागांनी गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे मुंबई प्रदेशकडून ६००, पुणे व छत्रपती संभाजीनगर प्रदेशकडून प्रत्येकी १,२५०, नाशिक येथून १,२७५, अमरावती ३२५, नागपूर येथून २०० मिळून एकूण ४,९०० बसची उपलब्धता अन्य विभागांनी केली आहे.