शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळ आपत्ती निवारणाची राज्यस्तरीय रंगीत तालीम, रत्नागिरीतील 'या' गावांचा समावेश

By शोभना कांबळे | Updated: November 1, 2023 19:17 IST

रत्नागिरी : चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी ७ नोव्हेंबर रोजी टेबलटॉप एक्जरसाईज अर्थात नियोजन, तर ९ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष राज्यस्तरीय रंगीत ...

रत्नागिरी : चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी ७ नोव्हेंबर रोजी टेबलटॉप एक्जरसाईज अर्थात नियोजन, तर ९ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष राज्यस्तरीय रंगीत तालीम होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पाच गावे निश्चित करण्यात आली आहेत.राजापूर तालुक्यातील आंबोळगड, रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे, गुहागरमधील वेलदूर, दापोली मधील कर्दे आणि मंडणगड मधील वाल्मिकीनगर या गावांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी दिली.चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी होणाऱ्या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने बुधवारी (दि. १ रोजी) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, पोलीस उप अधीक्षक निलेश माईनकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे आदींसह नोडल अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यातील या ५ गावांमध्ये ९ तारखेला सकाळी ९ ते दुपारी १ या दरम्यान होणाऱ्या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने विशेष नियोजन करण्यात येणार आहे. चक्रीवादळ आपत्ती निवारण रंगीत तालिमीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी, करण्यात येणारे उपाय योजना, साधनसामुग्री उपलब्धता, मनुष्यबळ, किनाऱ्यावरील नागरी वस्तीचे स्थलांतरण, करावयाची कार्यवाही, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, निवारा केंद्रे, फूड पॅकेट आदींबाबत या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcycloneचक्रीवादळ