शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणच्या प्रांताधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाचा राज्यस्तरीय पुरस्कार

By संदीप बांद्रे | Updated: January 22, 2024 17:47 IST

चिपळूण : येथील प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना निवडणूक आयोगाचा राज्यस्तरीय उकृष्ठ मतदार नोंदणी पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे. चिपळूण ...

चिपळूण : येथील प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना निवडणूक आयोगाचा राज्यस्तरीय उकृष्ठ मतदार नोंदणी पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे. चिपळूण विधानसभा मतदार संघात मतदार नोंदणीसाठी सातत्याने केलेल्या कामांची दखल घेत प्रांताधिकारी लिगाडे यांना कोकण विभागातील ७५ विधानसभा मतदार संघातून राज्यस्तरीय उकृष्ठ नोंदणी पुरस्कारासाठी निवड केली आहे.राज्यात २०२३-२४ मध्ये वर्षभराच्या कालावधीत निवडणूक विषय संदर्भात केलेल्या उल्लेखनिय व नाविन्यपुर्ण कामगिरीच्या आधारे निवडणूक आयोगाने  राष्ट्रीय मतदार निमीत्त पारितोषीक व सत्कार वितरणातील विभागनिहाय विविध अधिकाऱ्यांची निवड केली आहे. यामध्ये चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांची उकृष्ठ मतदार नोंदणी पुरस्कारासाठी निवड झाली आहे. प्रांताधिकाऱ्या लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ३३६ बीएलओ व अधिकाऱ्यांनी मतदान नोंदणीचे काम केले. चिपळूण मतदार संघात जवळपास २ लाख ८९ हजार मतदार होते. मात्र यामध्ये मयत झालेल्या मतदारांची संख्याही मोठी होती. तसेच गाव सोडून इतर ठिकाणी स्थलांतरित झालेल्या मतदारांचाही समावेश होता. मतदार यादी अद्यावत करण्यासाठी बीएलओंच्या माध्यमातून घरोघरी भेटी देऊन त्याचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणात मतदारांची परिपुर्ण माहिती घेत मयत झालेल्या तसेच स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे वगळण्यात आली. याशिवाय ज्यांनी मतदार नोंदणी केलेली नाही, अशांची नोंदणी करण्यात आली. मतदार नोंदणी वाढण्यासाठी मतदार संघातील महाविद्यालयांमध्ये जनजागृती शिबीरे घेण्यात आली. कातकरी समाजासाठी स्वतंत्र त्यांच्या वस्तीत शिबीरे घेत मतदार नोंदणी करण्यात आली. विविध मंडळाशी संपर्क साधून जागृती करण्यात आली. याचा परिपाक म्हणून  ९ ते १० हजार मतदारांची नोंदणी वाढण्यास मदत झाली. यात सहभागी असलेल्या सर्वानी चोख कामगिरी बजावल्याने अद्यावत मतदार यादी होण्यास मदत झाली. निवडणूका जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्षात मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर आपला भर असल्याचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग