शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

बँक्स असोसिएशनचे राज्य अधिवेशन

By admin | Updated: February 6, 2017 00:41 IST

विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती; विविध विषयांवर चर्चा

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दि. ४ व ५ फेब्रुवारी रोजी दि महाराष्ट्र एम्प्लॉईज बँक्स को-आॅप. असोसिएशन लि., मुंबईचे १७वे राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात पार पडले. या दोनदिवसीय अधिवेशनासाठी राज्यातील २६ पगारदार बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, संचालिका, तज्ज्ञ संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी या अधिवेशनाचे उद्घाटन गणपतीपुळचे सरपंच महेश ठावरे व मालगुंडच्या सरपंच श्वेता खेऊर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या अधिवेशनामध्ये ८ नोव्हेंबरच्या निश्चलीकरणानंतर बँकांना रिझर्व बँक आॅफ इंडियाच्या धोरणानुसार ज्या काही समस्यांना सामोरे जावे लागले व त्यानुषंगाने आगामी काळात पगारदार बँकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या याबाबत चर्चासत्र घेण्यात आले. तर ५ फेब्रुवारी रोजीच्या दुसऱ्या सत्राला सहकार भारतीचे अध्यक्ष सतीश मराठे, महाराष्ट्र स्टेट को - आॅप. कॅश्यू प्रोसेसिंग फेडरेशन लि.,चे अध्यक्ष धनंजय यादव, अ‍ॅड. दीपक पटवर्धन उपस्थित होते. यावेळी आगामी काळात सहकार क्षेत्राला सरकारकडून बँकांबाबत कसा सकारात्मक दृृष्टीकोन राहिल, याबाबत सतीश मराठे यांनी मार्गदर्शन केले. या क्षेत्रातील विविध तांत्रिक व वैधानिक स्वरुपातील समस्यांवर समिती नेमून सहकार क्षेत्राच्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच पगारदार बँकांना भरावा लागणारा दुहेरी कर भरावा लागू नये, याबाबतही प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगितले. त्यानंतर स्मरणिका प्रकाशन सोहळा झाला. या अधिवेशनात राज्यातील विविध बँकांचा सत्कार करण्यात आला. तसेच कार्यकारिणीचे माजी संचालक तुळशीराम चौधरी हे अंबरनाथ नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमात पर्यटक निवास व्यवस्थापक सुधाकर आवटे, तरंग उपाहारगृहाचे शंकर शेट्टी आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला असोसिएशनचे अध्यक्ष विजय आगटे, कार्याध्यक्ष तुषार होर्लेकर, सचिव सुरेश खुटाळ, उपाध्यक्ष स्नेहा राणे, सुधीर पगार, तंत्र संचालक डी. के. जोशी, जालंदर चकोर, भूपेंद्र ठाणेकर, पर्ण माळी, पी. बी. पाणीग्रही आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)