रत्नागिरी : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे परत करण्यास जिल्ह्यातील अपात्र लाभार्थ्यांकडून प्रारंभ झाला आहे. तहसीलदारांकडून या शेतकऱ्यांना नोटीस पाठविण्यात आल्या असून नोटीस मिळाल्यानंतर चार दिवसांच्या आत हे पैसे परत करण्याचे आदेश दिल्यानंतर आता पैसे परत करण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील आयकरदाते असलेल्या शेतकऱ्यांकडून २१ लाख ८२ हजार तर अन्य प्रकारे अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून ४ लाख ९८ हजार अशी एकूण २६ लाख ८० एवढी रक्कम परत करण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात मिळण्यासाठी मार्च २०१८ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत वर्षातून तीन टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्याला सहा रूपये शासनाकडून देण्यात येतात. त्यासाठी तो भूधारक असावा, ही महत्वाची अट आहे. त्याचबरोबर तो आयकर दाता नसावा, पती - पत्नीपैकी एकालाच या योजनेचा लाभ मिळेल, असे निकष या योजनेसाठी ठेवण्यात आले होते.या योजनेसाठी जिल्ह्यातील २ लाख ५३ हजार शेतकऱ्यांचे अर्ज पात्र ठरले होते. यापैकी काही शेतकऱ्यांना दोन वर्षात सहा टप्प्यात प्रत्येकी दोन हजार रूपये एवढे पैसेही मिळाले होते. मात्र, केंद्र सरकारच्या पोर्टलवर नाव नोंदणी केलेल्या या शेतकऱ्यांपैकी काही आयकर दाते असल्याचे त्यांनी जोडलेल्या आधार क्रमांकावरून निदर्शनास आले होते. त्यामुळे अशा शेतकऱ्यांची यादी संबंधित जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आली होती. आयकर दाते तसेच अन्य कारणाने अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचे पैसे शासनाकडे जमा करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी सरकारने जिल्हा प्रशासनाला दिले होते.त्यानुसार प्रत्येक तालुक्यात तहसीलदार यांनी अशा अपात्र शेतकऱ्यांना नोटीस काढल्या. त्यानुसार जिल्ह्यात २,४२१ शेतकरी आयकरदाते असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा शेतकऱ्यांकडून २१ लाख ८२ हजार, तर अन्य कारणांनी अपात्र असलेल्या ३,८३३ शेतकऱ्यांकडून ४ लाख ९८ हजार एवढी रक्कम जमा झाली आहे. अजूनही ही रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा करून घेतली जात आहे
अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसुलीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 13:01 IST
farmar, ratnagirinews पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे परत करण्यास जिल्ह्यातील अपात्र लाभार्थ्यांकडून प्रारंभ झाला आहे. तहसीलदारांकडून या शेतकऱ्यांना नोटीस पाठविण्यात आल्या असून नोटीस मिळाल्यानंतर चार दिवसांच्या आत हे पैसे परत करण्याचे आदेश दिल्यानंतर आता पैसे परत करण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील आयकरदाते असलेल्या शेतकऱ्यांकडून २१ लाख ८२ हजार तर अन्य प्रकारे अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून ४ लाख ९८ हजार अशी एकूण २६ लाख ८० एवढी रक्कम परत करण्यात आली आहे.
अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसुलीला प्रारंभ
ठळक मुद्देअपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसुलीला प्रारंभकिसान सन्मान योजना, २६ लाख ८० हजार जमा