शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गाडी ओढत पोलीस अधीक्षकांना दिला कर्मचाऱ्यांनी निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 15:06 IST

रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची जळगाव येथे बदली झाली आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी डॉ. मुंढे यांची फुलांनी सजवलेल्या जीपमधून पोलीस मैदानात रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देगाडी ओढत पोलीस अधीक्षकांना दिला कर्मचाऱ्यांनी निरोपरत्नागिरीकरांची चांगली साथ : प्रवीण मुंढे

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची जळगाव येथे बदली झाली आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी डॉ. मुंढे यांची फुलांनी सजवलेल्या जीपमधून पोलीस मैदानात रॅली काढण्यात आली. जिल्ह्यातील सर्व अधिकारी रॅलीत सहभागी झाले होते. पोलीस अधिकाऱ्यांचे हे प्रेम पाहून डॉ. मुंढेही गहिवरले. असा निरोप समारंभ न पाहिल्याचे ते म्हणाले.गेल्या दोन वर्षात रत्नागिरीकरांनी आपल्या प्रत्येक कामात चांगला प्रतिसाद दिला. कोणत्याही संकट काळात रत्नागिरीकर पोलिसांच्या बरोबर उभे राहिले. त्यामुळे याठिकाणी २ वर्षे कधी पूर्ण झाली कळले नाही, असे भावोद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी काढले.डॉ. प्रवीण मुंढे यांची जळगाव येथे बदली झाली असून, रविवारी येथील पोलीस मुख्यालय बहुउद्देशीय हॉलमध्ये त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. यावेळी डॉ. मुंढे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, प्रवीण पाटील, पोलीस उपअधीक्षक आयुब खान, उपविभागीय पोलीस अधिकारी निवास साळोखे, लक्ष्मण खाडे व पोलीस अधिकारी उपस्थित होते.डॉ. मुंढे पुढे म्हणाले की, दोन वर्षांच्या कारकीर्दीत जे काही पोलीस दल आणि रत्नागिरीकरांसाठी सामाजिक बांधिलकीतून करणे शक्य होते, ते प्रामाणिपणे करण्याचा प्रयत्न केला. यावेळी माझ्या संपूर्ण टीमने मला पूर्ण साथ दिली, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, पत्रकार, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांनी मनोगत व्यक्त केले. पोलीस दलातर्फेही अनेकांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे निवेदन जान्हवी पाटील यांनी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी आभार मानले.

टॅग्स :PoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी