शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरातील एसटी कर्मचाऱ्याचे ह्र्दयविकाराच्या झटक्याने निधन, निलंबनाची कारवाई झाल्याने होते तणावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 13:25 IST

राजापूर आगारातील चालक व वाहक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याचे ह्र्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निलंबनाची कारवाई झाल्याने होते तणावात.

राजापूर : एसटीच्या संपात सहभागी झाल्यामुळे निलंबनाची कारवाई झालेला राजापूर आगारातील चालक व वाहक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याचे ह्र्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राकेश रमेश बांते (वय ३५) असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.   ही घटना काल, बुधवारी रात्रीच्या सुमारास  घडली. राजापूर आगारातील सुमारे वीस ते पंचवीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांकडुन मिळाली. त्यामध्ये गेली चार वर्षे चालक व वाहक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारे राकेश बांते यांचा देखील समावेश होता. डिसेंबर महिन्याच्या दहा तारखेला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासुन ते तणावाखाली होते अशी माहिती एसटीच्या काही कर्मचाऱ्यांनी दिली. दरम्यान अत्यावस्थ वाटु लागल्याने काल, बुधवारी त्यांना राजापुरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र रात्री साडेदहाच्या दरम्यान त्यांना ह्र्दयविकाराचा तीव्र झटका आला व त्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालविली.मयत राकेश बांते हे विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील असून, गेली चार वर्षे ते राजापूर आगारात कार्यरत होते. ते पत्नी व चार वर्षे  एक व सव्वा वर्ष अशा दोन मुलांसह राजापुरात रहात होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन सुरु होते भंडारा येथील त्यांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

एसटी महामंडळाचे शासनात विलिनिकरण करावे या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ करुन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहेत. सरकारकडून वेळोवेळी कर्मचाऱ्यांना कामावर हजर व्हावे यासाठी आवाहन करण्यात येत आहे. इतकेच नाही तर कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निलंबण्याची कारवाई रद्द करण्यात येईल असेही सरकारने जाहीर केले आहे.सरकारच्या या आवाहनाला काही कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देत कामावर हजर होण्याचा निर्णय घेतला. यानंतर एसटी सेवा काही प्रमाणात सुरळीत सुरु झाली. यानंतर काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीST Strikeएसटी संप