शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:ला स्वामी समर्थांचा अवतार समजणा-या श्रीकृष्ण पाटील बाबाला जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 19:06 IST

विनयभंगाच्या आरोपावरुन अटक करण्यात आलेल्या आणि स्वत:ला स्वामी समर्थांचा अवतार समजणा-या श्रीकृष्ण पाटील बाबाला गुरुवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला.  

ठळक मुद्देविनयभंगाच्या आरोपावरुन अटक व सुटकाआणखी गुन्हा दाखल होण्याची शक्यता बाबाला वाचविण्यामागे राजकीय लोकांचा हात

रत्नागिरी, दि. 21 - विनयभंगाच्या आरोपावरुन अटक करण्यात आलेल्या आणि स्वत:ला स्वामी समर्थांचा अवतार समजणा-या श्रीकृष्ण पाटील बाबाला गुरुवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला.  रत्नागिरीतील या श्रीकृष्ण पाटील बाबाला विनयभंगाच्या आरोपावरुन आज सकाळी अटक करण्यात आली होती. येथील ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये बाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर पोलिसांच्या डीबी पथकाने त्याच्यावर कारवाई केली. त्यानंतर त्याला दुपारी कोर्टात हजर केले असता त्याची जामीनावर सुटका करण्यात आली. दरम्यान, या बाबाला वाचविण्यामागे राजकीय लोकांचा हात असल्याचे समजते. मात्र, आता त्याच्यावर जादुटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची आणि त्याचा मठ कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे. त्यामुळे त्याच्यावर दुसरा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, श्रीकृष्ण पाटील बाबाची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. भक्तांना मार्गदर्शन करतानाही हा बाबा शिवराळ भाषा वापरायचा. बुधवारी रात्री उशिरा त्याला रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर गुरुवारी सकाळी त्याला रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या हवाली केले. स्वत:ला स्वामी समर्थांचा अवतार मानणारा हा बाबा पोलीस खात्यात नोकरीला होता. रत्नागिरीतल्या झरेवाडीमध्ये या बाबाचा मठ आहे. पोलीस दलातून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने मठ स्थापन केला. पाटीलबाबा तथा पाटीलबुवा याचा एक व्हिडीओ गेले काही दिवस सोशल मीडियावर गाजत होता. या व्हिडिओमध्ये हा बाबा नटून थटून लोकांना सामोरा जात असल्याचे दिसत आहे. त्यात तो महिलांबाबत अर्वाच्च शब्दही वापरत आहे. स्वतःला स्वामी समर्थांचा अवतार समजणारा हा बाबा अनेक प्रकारचे दावे करत असल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याआधारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह सहा संस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले. त्याचवेळी दोन महिलांनी पाटीलबाबा व त्याचा सहकारी रावराणे अशा दोघांवर विनयभंग आणि शिवीगाळीची फिर्याद दिली. त्याआधारे या बाबाला बुधवारी मध्यरात्रीनंतर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याच्या आरोपावरुन त्याला अटक करण्यात आली होती.