शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Ratnagiri: भैरी बुवाच्या भेटीसाठी श्री नवलाई, पावणाई, म्हसोबाच्या पालख्या; भाविकांची मोठी गर्दी

By मेहरून नाकाडे | Updated: March 25, 2024 17:06 IST

रंगपंचमीनंतरच पालखी मंदिरात परतणार

रत्नागिरी : बारा वाड्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरी बुवाच्या भेटीसाठी जाकीमिऱ्या व सडामिऱ्या येथील श्री नवलाई, पावणाई, म्हसोबाच्या पालख्या आल्या होत्या. जाकीमिऱ्याची पालखी भैरी भेटीनंतर बाहेर पडत असतानाच सडामिऱ्या येथील पालखीचे आगमन श्री भैरी मंदिराच्या प्रांगणात झाले. मंदिराच्या प्रांगणात काल, रविवारी रात्री ११.३० वाजता दोन्ही पालख्यांची भेट होताच हजारो भाविकांनी एकच गजर केला.

कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शिमगोत्सवासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गावी आले आहेत. श्री भैरी मंदिरात होणारी पालख्यांची भेट पाहण्यासाठी दरवर्षी भाविकांची गर्दी होते. यावर्षीही भेट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिराच्या आवारात गर्दी केली होती. अनेक भाविकांनी पालखी भेटीचा सोहळा टिपण्यासाठी कॅमेरे सज्ज ठेवले होते.सडा मिऱ्या व जाकीमिऱ्या येथील पालख्यांची भेट झालेनंतर भाविकांनी पुष्पवृष्टी केली. रंग उधळण्यात आले. फटाक्याची जोरदार आतषबाजी करण्यात आली. जाकीमिऱ्या व सडामिऱ्या येथील दोन्ही पालख्या गेल्यानंतर ग्रामदैवत श्री भैरीबुवाची पालखी वाजतगाजत मंदिराबाहेर पडली. मंदिराच्या आवारात मोठ्या प्रमाणात मध्यरात्री पर्यंत भाविकांची गर्दी होती. पालखी भेटीचा आनंद भाविकांना अनुभवता यावा यासाठी मंदिराच्या प्रांगणात जागोजागी एलईडी स्क्रीन लावण्यात आले होते.शिमगोत्सवानिमित्त श्री भैरी मंदिरात मोठ्या प्रमाणावर विद्युत रोषणाई करून पताका, फुले लावून सजावट करण्यात आली आहे. बारा वाड्याचे ग्रामदैवत असलेले भैरी बुवा भक्ताच्या भेटीला मंदिराबाहेर पडले आहेत. पालखी मानाच्या ठिकाणी जाणार असून पूजा स्विकारली जाणार आहे. त्यामुळे सध्या शहरात वाद्याच्या गजरात भाविक पालखी नाचविण्याचा आनंद घेण्यात येत आहे. रंगपंचमीनंतरच पालखी मंदिरात परतणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी