शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेस गाड्यांचा वेग वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 13:23 IST

कोकण रेल्वेमार्गावरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेस या गाड्यांचे रुप आता पालटणार आहे. सध्या वापरात असलेल्या या गाड्यांची जागा नव्या एलएचबी (लिके होल्फमन बुश) गाड्या घेणार आहेत. येत्या मे महिन्याच्या अखेरीस या गाड्या कोकण रेल्वे मार्गावर धावतील, अशी शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. या गाड्यांचा वेगही आता १०० किलोमीटरवरून १३० किलोमीटरपर्यंत वाढणार आहे.

ठळक मुद्देकोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेस गाड्यांचा वेग वाढणारगाड्यांचे रूपडे पालटणार, डब्यांची लांबी-रुंदी वाढलीस्टील,अ‍ॅल्युमिनियमपासून नवीन आरामदायी डबे

रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेस या गाड्यांचे रुप आता पालटणार आहे. सध्या वापरात असलेल्या या गाड्यांची जागा नव्या एलएचबी (लिके होल्फमन बुश) गाड्या घेणार आहेत. येत्या मे महिन्याच्या अखेरीस या गाड्या कोकण रेल्वे मार्गावर धावतील, अशी शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. या गाड्यांचा वेगही आता १०० किलोमीटरवरून १३० किलोमीटरपर्यंत वाढणार आहे.नव्या गाड्यांचा रंग लाल-करडा असेल. डब्यांची लांबी आणि रुंदी वाढविण्यात आली असून, मोठे प्रवेशद्वार, आधुनिक बेसिन आणि शौचालये अशा सुविधा त्यात अंतर्भूत असणार आहेत. कपुरथळा (पंजाब) येथील रेल कोच फॅक्टरीत लिके होल्फमन बुश हे आधुनिक डबे बनविण्यात येत आहेत.

भविष्यात संपूर्ण देशात एलएचबी प्रकारातील डबे वापरण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली. डब्यांची लांबी आणि रुंदी वाढल्याने प्रवाशांना गाडीतून फिरण्यास जास्त जागा मिळणार आहे. बेसिन, टॉयलेटच्या रचनेतही बदल करण्यात आले आहेत. दरवाजातील जुनी चिंचोळी जागा वाढविण्यात आलेली आहे. त्यामुळे चढताना व उतरताना प्रवाशांना धक्काबुक्की, गर्दीला सामोरे जावे लागणार नाही.नव्या गाडीमध्ये प्रवासी क्षमता वाढणार आहे. शयनयान (स्लीपर कोच) डब्यात ७२ ऐवजी ८० प्रवासी झोपू शकतील, अशी व्यवस्था आहे. एसी ३ टायर (बी १ ते बी ५) मध्ये ६४ ऐवजी ७२ प्रवासी, एसी २ टायरमध्ये ५४ आणि एचए १ मध्ये २४ प्रवासी क्षमता आहे. त्यामुळे कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये एकूण १२४ प्रवासी क्षमता आणि मांडवी एक्स्प्रेसमध्ये ९४ प्रवासी क्षमता वाढली आहे. स्लीपर कोचमध्ये लोअर बर्थची रुंदी वाढण्याने ज्येष्ठ नागरिकांना झोपण्यास जादा जागा मिळणार आहे.कोचची बांधणी अ‍ॅल्युमिनिअम धातूनेकोकणकन्या व मांडवी एक्सप्रेस या गाड्यांचे रूप नेमके कसे असेल, याबाबत प्रवाशांमध्येही उत्सुकता आहे. एलएचबी कोचची बांधणी बाहेरून स्टील आणि आतून अ‍ॅॅल्युमिनिअम धातूने करण्यात आली आहे. परिणामी गाडीचे वजन कमी होऊन गाडीचा वेग १०० किलोमीटरवरून १३० किलोमीटरपर्यंत वाढणार आहे. या गाड्यांचे एलएचबी डबे अँटी टेलिस्कोपिक पद्धतीचे असून, त्यांचे वजन साधारण ३९.५ टन इतके आहे. त्यामुळे अपघाताच्या वेळी हे डबे उलटण्याची शक्यता कमी आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी