शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

खुशखबर; स्पेशल ट्रेनचे ओझे उतरणार; वाढीव तिकीट हाेणार कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 13:44 IST

शोभना कांबळे रत्नागिरी : रेल्वे मार्गावरील सर्व विशेष गाड्यांचे तिकीट दर कमी केल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली असून ...

शोभना कांबळेरत्नागिरी : रेल्वे मार्गावरील सर्व विशेष गाड्यांचे तिकीट दर कमी केल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. या विशेष गाड्यांचे तिकीट दर कमी होण्याबरोबरच कोकणातून धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या पुन्हा नियमित धावणार असून त्यांचे तिकीट दरही पूर्ववत होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून सुमारे दीड वर्षानंतर पॅसेंजरची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे.

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताच २२ मार्चपासून देशभरात लाॅकडाऊन सुरू करण्यात आले. त्यामुळे सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सुमारे पाच महिने रेल्वेही बंदच होत्या. ऑगस्टमध्ये गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र, या गाड्या पूर्णपणे आरक्षित होत्या. त्यांचे तिकीट दरही भरमसाट होते. त्याचप्रमाणे या गाड्यांसाठी ठराविकच थांबे असल्याने सामान्य लोकांची गैरसोय होत होती.

ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले, त्यामुळे डिसेंबरपासून बहुतांशी निर्बंध हटविण्यात आले. मात्र, पॅसेंजर गाड्या बंदच होत्या. सामान्य प्रवाशांकडून या गाड्या सुरू करण्याची सातत्याने मागणी करण्यात येत होती. सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या तसेच वेळ आणि श्रम वाचविणारा व सुखकारक असा रेल्वेचा प्रवास असल्याने, या गाड्यांची मागणी होत होती.

दिवाळीच्या हंगामात दोन पॅसेजर विशेष गाड्या म्हणून सुरू केल्या. आता या पॅसेंजर गाड्यांसह सर्वच गाड्या नियमित तिकिटासह सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.

सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन...

- जनशताब्दी एक्स्प्रेस

- तेजस एक्स्प्रेस

- कोकण कन्या एक्स्प्रेस

- तुतारी एक्स्प्रेस

- मांडवी एक्स्प्रेस

- मंगला एक्स्प्रेस

गाड्यांची संख्या वाढणार

- सुमारे दीड वर्ष कोकण रेल्वे मार्गावर पूर्वीच्या कमी दरापेक्षा तिप्पट - चाैपट दराने प्रवास करावा लागत होता. मात्र, आता रेल्वे प्रशासनाने पूर्वीच्या कमी दरात या गाड्या नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे.

- त्यासाठी या विशेष गाड्या पूर्वीच्या तिकीट दरात सुरू करण्यात आल्या आहेत. तिकीट कमी असल्याने प्रवासी वाढणार असल्याने गाड्यांची संख्याही वाढेल.

पॅसेंजरची प्रतीक्षा संपली

रत्नागिरी - दादर (मुंबई) पॅसेंजर आणि दिवा - मडगाव या कोकण मार्गावर धावणाऱ्या दोन पॅसेजर गाड्या कोरोना काळात बंद राहिल्या. आता त्या नियमित दराने सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्यांचे भाडे १०० रुपयांच्या आत असल्याने सामान्यांना मुंबई प्रवास परवडणारा आहे.

तिप्पट तिकिटाचा बाेजा हाेणार कमी

रेल्वे प्रशासनाने गाड्यांचा स्पेशल दर्जा हटविण्याचा निर्णय घेतला असून गाड्यांना पूर्वीचे क्रमांक देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आरक्षण प्रणालीही अद्ययावत केली जात आहे. त्यामुळे तिकीट दर कमी होणार आहेत.

आतापर्यंत कोकण मार्गावर धावणाऱ्या विशेष गाड्यांचे तिकीट दरही आता पूर्वीसारखे कमी करण्यात आले आहेत. त्याचबरोबर सर्वच प्रवाशांची पॅसेजर गाड्यांसाठी मागणी होती. ती मागणीही आता पूर्ण केली असून या पॅसेंजर गाड्यांमधून प्रवास करताना पूर्वीच्या तिकिटातच करता येणार आहे.- उपेंद्र शेंड्ये, क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक, रत्नागिरी विभाग

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीrailwayरेल्वे