चिपळूण : येथील पंचायत समितीच्या मावळत्या सभापती धनश्री शिंदे यांना नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन, बेळगावी व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे ‘विशेष सामाजिक सेवा गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. २८ मार्च रोजी बेळगाव येथे मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार आहे.
शिंदे या सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. पंचायत समितीच्या सभापती पदावर काम करताना त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले. महिला सक्षमीकरणावर भर दिला. शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले. महिला स्वयंसहाय्यता समूहांना प्रोत्साहन दिले. याबरोबरच तालुक्यातील विविध भागातील विकासकामांसाठीही महत्त्वाचे योगदान दिले. ग्रामीण भागातील शाळा, ग्रामपंचायतींच्या इमारतींची दुरवस्था असो अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाज पाहण्यासाठी गावांना भेट देऊन ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडवल्या.
शिंदे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊनच त्यांची ‘विशेष सामाजिक सेवा गौरव’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पदक, विशेष प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, म्हैसूर फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
.....................
पासपोर्ट फोटो आहे.