शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

ज्या कंपनीत काम केले तिथेच दिली भेट, विशेष पोलिस महानिरीक्षक रमले आठवणीत

By अरुण आडिवरेकर | Updated: February 15, 2024 13:13 IST

लोटे येथील घरडा केमिकल कंपनीला संजय दराडे यांची अचानक भेट

अरुण आडिवरेकररत्नागिरी : बुद्धिमत्ता आणि कष्टाच्या जाेरावर विशेष पाेलिस महानिरीक्षक पदापर्यंत पाेहोचलेले अभियंता संजय दराडे यांनी आपल्या पहिल्या नोकरीच्या ठिकाणी लाेटे (ता. खेड) येथील घरडा केमिकल कंपनीला बुधवारी भेट दिली. या भेटीत त्यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांशी संवाद साधून आठवणींना उजाळा दिला.काेकण परिक्षेत्राचे विशेष पाेलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी आठ दिवसांपूर्वी पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते बुधवारी रत्नागिरी जिल्हा दाैऱ्यावर आले हाेते. या दाैऱ्यात त्यांनी घरडा केमिकल कंपनीला भेट देऊन तेथील सुरक्षिततेबाबत पाहणी केली. यावेळी त्यांच्यासाेबत अतिरिक्त पाेलिस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि कंपनीचे अधिकारी उपस्थित हाेते.दराडे यांनी केमिकल इंजिनिअरिंग केले असून, २०२१-२०२२ या कालावधीत घरडा कंपनीत मेटनन्स इंजिनिअर म्हणून काम केले हाेते. एक वर्ष काम केल्यानंतर त्यांनी नाेकरी साेडली आणि केंद्रीय लाेकसेवा आयाेगाची परीक्षा देऊन ते पाेलिस दलात सामील झाले. आता पाेलिस महानिरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आपण काम केलेल्या घरडा कंपनीला त्यांनी अचानक भेट देऊन सहकाऱ्यांशी संवाद साधला. या भेटीत त्यांच्यासह त्यांचे जुने सहकाऱ्यांनाही गहिवरून आले.संजय दराडे यांनी सांगितले की, महाड येथील दुर्घटनेची पुनरावृत्ती हाेऊ नये म्हणून ही भेट हाेती. माझ्या वाटचालीत माझ्या सहकाऱ्यांचाही सहभाग आहे. त्यामुळे त्यांना भेटून आनंद झाला. मी प्रशिक्षक म्हणून हाेताे पण सहकाऱ्यांनी खूप काही शिकविले. असे ते म्हणाले.ते पुढे म्हणाले की, मी आयपीएस अधिकारी व्हावे अशी माझ्या आई-वडिलांची इच्छा हाेती.  त्यामुळे नाेकरी साेडून युपीएससीची तयारी सुरू केली. मेहनत, चिकटी यामुळे सन २००५ मध्ये परीक्षा उत्तीर्ण झालाे. विविध भागांत काम केल्यानंतर इथंपर्यंत पाेहाेचलाे आहे. अतिशय लांब असा हा प्रवास असल्याचे त्यांनी सांगितले.

‘मॅनेजर’ आले की गुलया भेटीत ते जुन्या सहकाऱ्यांशी गप्पा मारताना रमून गेले हाेते. सहकाऱ्यांसाेबत शिकता-शिकता खूप चांगला काळ गेला. त्यावेळी कडक शिस्तीचे मॅनेजरही हाेते. ते आले की, आम्ही सगळे पळून जायचाे, अशी जुनी आठवण विशेष पाेलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी सांगितली. सुरुवातीला आल्यावर वास यायचा पण दाेन आठवड्यानंतर शरीरानेही हा वास स्वीकारला आणि वास येणे बंद झाल्याची आठवण त्यांनी सांगितली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी