चिपळूण : शहरातील उक्ताड येथील आरक्षण क्रमांक ३४ ही जागा वाहन तळासाठी आरक्षित आहे. कोणतीही परवानगी न घेता या जागेवर मंडप उभारणीचे काम सुरु करण्यात आले आहे. याबाबत शिवसेनेच्या नगरसेवक सुरेखा खेराडे, प्रभारी मुख्याधिकरी जयंत जावडेकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर याची दखल घेण्यात आली आहे. जागेची मोजणी करुन कर आकारणी करण्यात आली आहे.चिपळूण शहरातील उक्ताड येथे आरक्षण क्रमांक ३४ ही जागा वाहन तळासाठी राखीव आहे. या जागेवर गेल्या १५ दिवसांपूर्वी खासगी आयुर्वेदिक दवाखान्यासाठी झोपडी बांधण्यात आली होती. नगरसेवकाच्या तक्रारीनंतर हा दवाखाना तेथून हटविण्यात आला आहे. नगर परिषद प्रशासनाने शहरातील काही ठिकाणी मैदाने व अन्य मोकळी जागा वाहनतळासाठी आरक्षित केली आहे. मात्र, काही वेळा या जागांचा वापर कोणतीही परवानगी न घेता राजरोसपणे केला जात आहे. यामुळे नगर परिषदेचेही आर्थिक नुकसान होत आहे. उक्ताड येथील वाहन तळासाठी आरक्षित असणाऱ्या जागेत एका स्नेहसंमेलनासाठी मंडप उभारण्याचे काम सुरु आहे. याबाबत नगरसेविका खेराडे यांनी प्रभारी मुख्याधिकारी जावडेकर यांच्याकडे तक्रार केली.त्यानंतर जावडेकर यांनी बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याला तेथे पाठवून जागेची मोजणी केली. त्यानुसार भाडे आकारणी करुन संबंधित संस्थेचा अर्ज घेऊन परवानगी व करभरणा करण्यात आला आहे. (वार्ताहर)आपला विरोध नाही कोणत्याही धार्मिक अथवा घरगुती कार्यक्रमांना आपला विरोध नाही, तर नगर परिषदेची परवानगी घेऊन कार्यक्रम करावे. प्रशासनाचे आर्थिक नुकसान होऊ नये, हा यामागचा प्रामाणिक हेतू आहे, असे सुरेखा खेराडे यांनी सांगितले.उक्ताड येथील आरक्षण क्र. ३४ ही जागा वाहनतळासाठी आरक्षित.मुख्याधिकारी जावडेकर यांनी दिली भेट.मैदाने पार्किंगसाठी आरक्षित असणे आवश्यक.राजरोस वापराला विरोध.
‘त्या’ जागेची अखेर करआकारणी होणार
By admin | Updated: January 15, 2015 23:35 IST