लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : तालुक्यातील एकमेव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना सुरू आहे. महत्त्वाच्या नळपाणी पुरवठा योजनेच्या सुकाणू समिती अध्यक्षपदी साेमनाथ पावसे यांची निवड करण्यात आली आहे.
आमदार सूर्यकांत दळवी यांच्या सतत प्रयत्नातून सन २००७ रोजी पूर्ण होऊन योजना सुरू झाली. कित्येक वर्ष पाणी टंचाईमुळे गावे त्रासली होती. ही याेजना सुरू झाल्याने गावातील लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला हाेता. ही योजना चालवताना कोणतेही शासकीय आनुदान मिळत नाही. चार गावांच्या स्वखर्चातूनच ही योजना सुरू आहे. त्यामध्ये हर्णै, पाजपंढरी, अडखळ आणि शिवाजी नगर या गावांचा समावेश आहे. त्यामुळे दरवर्षी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांचे फिरते चक्र आहे. यावर्षी हर्णै गावाला अध्यक्ष सोमनाथ पोशिराम पावसे, उपाध्यक्ष संजय महाडिक, जहुर कोडविलकर आणि सचिव भास्कर दोरकुलकर यांची सन २०२१ ते २०२२ या वर्षाकरिता निवड करण्यात आली आहे.