शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गेले डॉक्टर्स कुणीकडे, आरोग्य विभागाला कोडे, रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 12:17 IST

राज्यभरातील रुग्णालयांच्या बळकटीकरणासाठी तज्ज्ञ डॉक्टर्सच्या नियुक्तीची जाहिरात राज्य शासनाने १० नोव्हेंबरला प्रसिध्द केली आहे. त्यानुसार राज्यभरातील प्रत्येक जिल्हा शल्यचिकित्सकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार ही पदे भरण्यास आरोग्य सेवा आयुक्तांनी परवानगी दिली आहे. मात्र, जाहिरात प्रसिध्द होऊन २० दिवस झाले तरी कोणीही इच्छुक डॉक्टर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाकडे फिरकलेला नाही.

ठळक मुद्देडॉक्टर्सच्या नियुक्तीची जाहिरात राज्य शासनाने १० नोव्हेंबरला प्रसिध्दतब्बल २0 दिवसात एकही इच्छुक डॉक्टर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाकडे फिरकलेला नाही स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ या पदांवर वैद्यकीय अधिकारीच नाहीत रुग्णालयातील रुग्णसेवेवर गंभीर परिणामनवीन सी.टी.स्कॅन मशिन नाहीच

प्रकाश वराडकररत्नागिरी : राज्यभरातील रुग्णालयांच्या बळकटीकरणासाठी तज्ज्ञ डॉक्टर्सच्या नियुक्तीची जाहिरात राज्य शासनाने १० नोव्हेंबरला प्रसिध्द केली आहे. त्यानुसार राज्यभरातील प्रत्येक जिल्हा शल्यचिकित्सकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार ही पदे भरण्यास आरोग्य सेवा आयुक्तांनी परवानगी दिली आहे. मात्र, जाहिरात प्रसिध्द होऊन २० दिवस झाले तरी कोणीही इच्छुक डॉक्टर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाकडे फिरकलेला नाही. स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञ या अत्यंत महत्त्वाच्या पदांवर वैद्यकीय अधिकारीच नाहीत. जिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवेवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे.जिल्हा रुग्णालय आणि त्याअंतर्गत असलेली जिल्ह्यातील तीन उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालये यामध्ये रुग्णांवर उपचारासाठी आधुनिक मशिन्स, यंत्रणा आहे. मात्र, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने उपलब्ध अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा भार अधिक आहे.

असे असताना जिल्हा रुग्णालय व संबंधित रुग्णालयांमध्ये चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर व रुग्णालय व्यवस्थापनाची कारभार सांभाळताना कसरत होत आहे.सन १८८५मध्ये स्थापना झालेले रत्नागिरी जिल्हा रुग्णालय २०० खाटांचे असून, आणखी १०० खाटांच्या रुग्णालय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. जिल्हा रुग्णालयाअंतर्गत कळंबणी, दापोली व कामथे ही ३ उपजिल्हा रुग्णालये कार्यरत आहेत. तसेच मंडणगड, गुहागर, देवरुख, संगमेश्वर, लांजा, राजापूर, रायपाटण, पाली ही ग्रामीण रुग्णालये कार्यरत आहेत.

जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध आहे. मात्र, सोनोग्राफी मशीन वापरून रुग्णांना सेवा देणाºया रेडिओलॉजिस्टची पदे रिक्त आहेत. खासगी डॉक्टर्सच्या मदतीने आठवड्यातील मंगळवार, बुधवार व गुरुवार या तीन दिवशी सोनोग्राफीची सेवा रुग्णांना दिली जात आहे.

या स्थितीतही जिल्हा रुग्णालय व अन्य शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध कर्मचारी व यंत्रणेच्याआधारे रुग्णांना किमान चांगली सेवा देण्याचा प्रयत्न जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवकर यांच्या नेतृत्त्वाखाली अन्य डॉक्टर्स व कर्मचारी करीत आहेत.नवीन सी.टी.स्कॅन मशिन नाहीचजिल्हा रुग्णालयातील सी. टी. स्कॅन मशीन वर्षभरापूर्वीच नादुरुस्त झाले. हे मशीन दुरुस्तीवर मोठा खर्च करण्यात आला. मात्र, ती मशीन दुरुस्त होणार नसल्याने निर्लेखित करण्याचा निर्णय झाला. शासनाकडून जिल्हा रुग्णालयाला नवीन सी. टी. स्कॅन मशीन आॅगस्ट-सप्टेंबर २०१७ पर्यंत मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते.मात्र, नोव्हेंबर महिना संपत आला तरी या मशीनचा अद्याप पत्ता नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना सी. टी. स्कॅनची सेवा खासगी रुग्णालयातून घ्यावी लागत आहे. ग्रामीण भागातील रूग्णांसाठी फायदेशीर ठरणारे हे रूग्णालय आता समस्यांच्या गर्तेत अडकत चालले आहे.भूलतज्ज्ञांची तीनही पदे रिक्तजिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञांची तीन पदे मंजूर आहेत. मात्र, ही तीनही पदे रिक्त आहेत. शस्त्रक्रीयेसाठी भूलतज्ज्ञांची अत्यंत आवश्यकता असते. मात्र ही पदेच रिक्त असल्याने रुग्णालयाला खासगी तज्ज्ञांची सेवा घ्यावी लागते. जिल्हा रुग्णालयाला स्वत:चा भूलतज्ज्ञ मिळणार तरी कधी, असा सवाल केला जात आहे. रिक्त पदांच्या भरतीसाठी आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी यांनी प्रयत्न चालवलेले असताना ही पदे अद्याप भरली गेलेली नाहीत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटल