शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मंडणगड पंचायत समितीपदी स्नेहल सकपाळ सभापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 15:22 IST

panchyat samiti, Mandangad Nagar Panchayat, Chiplun, Ratnagiri मंडणगड पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या स्नेहल सकपाळ यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतीपदी प्रणाली चिले यांची निवड झाली. पंचायत समितीच्या जिजामाता सभागृहात दिनांक २७ ऑक्टोबर रोजी पीठासन अधिकारी शरद पवार यांच्या अधिपत्याखाली ही निवड प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, गटविकास अधिकारी एम. दिघे उपस्थित होते.

ठळक मुद्देमंडणगड पंचायत समितीपदी स्नेहल सकपाळ सभापती उपसभापतीपदी प्रणाली चिले बिनविरोध

मंडणगड : मंडणगड पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या स्नेहल सकपाळ यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतीपदी प्रणाली चिले यांची निवड झाली. पंचायत समितीच्या जिजामाता सभागृहात दिनांक २७ ऑक्टोबर रोजी पीठासन अधिकारी शरद पवार यांच्या अधिपत्याखाली ही निवड प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, गटविकास अधिकारी एम. दिघे उपस्थित होते.पंचायत समितीत चारपैकी तीन सदस्य शिवसेनेचे, तर एक सदस्य राष्ट्रवादीचा आहे. शिवसेनेच्या सर्व सदस्यांना संधी मिळावी, यासाठी सभापती व उपसभापती यांनी राजीनामे दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यात शिवसेनेचे आदेश केणे, प्रणाली चिले, स्नेहल सकपाळ यांनी उपस्थित राहून प्रक्रियेत सहभाग नोंदवला. सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला. यामुळे ही निवड बिनविरोध झाली. शेवटच्या सव्वा वर्षासाठी देव्हारे पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या स्नेहल सकपाळ सभापतीपदी विराजमान झाल्या.नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांना शुभेच्छा देण्यासाठी तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, संदेश चिले, भगवान घाडगे, शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषदेचे अर्थ आणि शिक्षण सभापती सुनील मोरे, अण्णा कदम, प्रेरणा घोसाळकर, सुरेश दळवी, रामदास रेवाळे, हरिश्चंद्र कोदेरे, दीपक मालुसरे, संजय शेडगे, राजेश भवणे, अमिता शिंदे, शहरप्रमुख विनोद जाधव, सिद्धेश देशपांडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीMandangad Nagar Panchayatमंडणगड नगरपंचायतChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरी