लाेकमत न्यूज नेटवर्क, दापाेली : दापाेली सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचा पर्दाफाश करत चाैघांना अटक केली आहे. अटक केलेल्या चाैघांमध्ये दाभाेळ सागरी पाेलिस स्थानकातील एका कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे पुढे आल्याने पाेलिस यंत्रणा हादरली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.१७) पहाटे दापाेली एस. टी. स्टँड येथे करण्यात आली.
संजय धाेपट (रा. दाभाेळ) या पाेलिस कर्मचाऱ्यासह युवराज माेरे (रा. मुंबई), नीलेश साळवी (रा. रत्नागिरी) आणि शिराज शेख (रा. मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. मुंबईतून दापाेलीकडे व्हेल माशाच्या उलटीची तस्करी हाेणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली हाेती. त्यानंतर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. शुक्रवारी पहाटे एका कारचा पाठलाग करून दापोली एस. टी. स्टँडजवळ त्यांना अडवण्यात आले. गाडीची तपासणी केली असता व्हेलची उलटी आढळून आली.
Web Summary : Four individuals, including a police officer, were arrested in Dapoli for smuggling whale vomit. Customs officials intercepted a car near the Dapoli ST stand and discovered the contraband, acting on a tip about the smuggling operation from Mumbai.
Web Summary : दापोली में व्हेल की उल्टी की तस्करी करते हुए एक पुलिसकर्मी समेत चार लोग गिरफ्तार। सीमा शुल्क अधिकारियों ने मुंबई से तस्करी की सूचना पर दापोली एस.टी. स्टैंड के पास एक कार को रोककर तलाशी ली, जिसमें उल्टी बरामद हुई।