शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

लोटे औद्योगिक वसाहत विस्तार समस्या संवादातून सुटेल : सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 17:17 IST

सुभाष देसाई म्हणाले की, उद्योग विभागाकडून ज्या मागण्या येतात त्यावर सकारात्मक निर्णय घेतले जातात. तरी औद्योगिक विस्तारात पर्यावरणाचा विचार होईल याची काळजी उद्योजकांनी घ्यावी. औद्योगिक विकास आणि पर्यावरण संवर्धन असणारा मजबूत महाराष्ट्र घडवला जावा अशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भूमिका राहिलेली आहे.

ठळक मुद्देयावेळी चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग संस्था आणि कुडाळ येथील संशोधक देवधर यांचा कोकण गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

रत्नागिरी : संवादातून सर्व वाद सुटू शकतात याच भूमिकेतून शासन आपली भूमिका बजावेल. आता लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी संवादासाठी पुढाकार घेतल्यावर विस्तारीत लोटे औद्योगिक वसाहतीचा प्रश्न सुटेल अशी खात्री राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लोटे (ता. खेड) येथे व्यक्त केले.खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक संघटनेतर्फे आयोजित कोकण गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला एमआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पी. अनबलगन, औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन तसेच डॉ. सतीश वाघ आणि सोनजे यांची प्रमुख उपस्थिती होती.सुभाष देसाई पुढे म्हणाले की, उद्योग विभागाकडून ज्या मागण्या येतात त्यावर सकारात्मक निर्णय घेतले जातात. तरी औद्योगिक विस्तारात पर्यावरणाचा विचार होईल याची काळजी उद्योजकांनी घ्यावी. औद्योगिक विकास आणि पर्यावरण संवर्धन असणारा मजबूत महाराष्ट्र घडवला जावा अशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भूमिका राहिलेली आहे.

सोबतच औद्योगिक सुरक्षेकडे सर्वांना लक्ष द्यावे व योग्य आणि प्रशिक्षित मनुष्यबळ असेल याचीही जबाबदारी उद्योगांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षात उद्योगांसमोरील अडचणी दूर करताना लागणाऱ्या परवान्यांची संख्या आम्ही २१पर्यंत आणली आहे. उद्योजक सर्वच बाबतीत उत्तमपणे काम करीत असतील तर याला शून्यापर्यंत नेण्यासही आपण तयार आहोत, असे ते म्हणाले. संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले.कोकण गौरव पुरस्काराचे वितरणएन्व्हायरमेंट क्लिअरन्स हा अत्यंत कटकटीचा वेळखाऊ आणि खर्चिक प्रकार आहे. संपूर्ण औद्योगिक क्षेत्राला इन्व्हरमेटर क्लिअरन्स घ्यावा. सीईटीपीच्या माध्यमातून ट्रीटमेंट केलेले पाणी दाभोळच्या खाडीत सोडले जाते त्या पाण्याच पाईपलाईन समुद्रापर्यंत न्यावी. लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये स्वतंत्र पोलीस स्टेशन मंजूर करावे अशा मागण्या उद्योजक संघटनेतर्फे यावेळी करण्यात आल्या. यावेळी चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग संस्था आणि कुडाळ येथील संशोधक देवधर यांचा कोकण गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMIDCएमआयडीसी