शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धेशला सैन्यात भरती व्हायचे होते..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 12:03 IST

पोहायला गेलेला भाऊ बुडतोय, असे दिसताच त्याने क्षणाचाही विलंब केला नाही आणि नदीच्या दिशेने झेप घेतली. पोहण्यात तरबेज असल्याने त्याने चुलतभावाला वाचवले. याचवेळी पाण्याचा प्रवाह वाढल्याने पट्टीचा पोहणारा असलेल्या सिद्धेशला मात्र जगाचा निरोप घ्यावा लागला.

ठळक मुद्देसिद्धेशला सैन्यात भरती व्हायचे होते..!आधार बनू पाहण्याची त्याची इच्छा अधुरीच

देवरुख : पोहायला गेलेला भाऊ बुडतोय, असे दिसताच त्याने क्षणाचाही विलंब केला नाही आणि नदीच्या दिशेने झेप घेतली. पोहण्यात तरबेज असल्याने त्याने चुलतभावाला वाचवले. याचवेळी पाण्याचा प्रवाह वाढल्याने पट्टीचा पोहणारा असलेल्या सिद्धेशला मात्र जगाचा निरोप घ्यावा लागला.

कुटुंबात एकुलता एक असलेल्या सिद्धेश झगडे याला सैन्यात जाण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने नुकतीच परीक्षादेखील दिली होती. मात्र, सैन्यात जाण्याची आणि कुटुंबाचा आधार बनू पाहण्याची त्याची ही इच्छा अधुरीच राहिली आहे.संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी येथील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या हृतिक चंद्र्रकांत झगडे याला वाचवताना सिद्धेश रवींद्र झगडे (२०) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पट्टीचा पोहणाऱ्या सिद्धेशला सैन्यात जाण्याची इच्छा होती. गेल्याच महिन्यात त्याने सैन्यात जाण्यासाठी प्रवेश परीक्षाही दिली होती. पण काळाने त्याच्यावर झडप घातल्याने सिद्धेशचे हे स्वप्न अपूर्णच राहिले.सिद्धेशच्या निधनामुळे कळंबुशी गावावर शोककळा पसरली आहे. सिद्धेश हा रविवारी दुपारी मित्राला वाचवताना बुडाला होता. त्यानंतर तब्बल २० तासाने त्याचा मृतदेह सापडला. सिद्धेश व हृतिक हे एकाच कुटुंबातील असून, रविवारी ते दोघे व इतर दोघे जनावरे चारायला खाचारआगार येथील पाणलोट बंधाऱ्यांवर गेले होते.

दोन दिवसांपासून कळंबुशी-माखजन भागात जोरदार पाऊस पडत असल्याने गावनदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. रविवारी सुटी असल्याने हृतिकला पोहण्याचा मोह झाला व त्याने सिद्धेश व इतर दोघांनाही पोहायला जाऊया, असे सांगितले. पण त्यांनी नकार दिला. यामुळे हृतिक हा एकटाच पोहायला गेला.

यावेळी त्याने बंधाऱ्यांजवळील डोहात उडी मारली. पण डोहाच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला. हृतिक बुडत असल्याचे लक्षात आल्याने त्याला वाचवण्यासाठी सिद्धेशने पाण्यात उडी मारली. सिद्धेश हा पट्टीचा पोहणारा असल्याने त्याने कसेबसे हृतिकला वाचवले. पण याचदरम्यान पाण्याची पातळी वाढल्याने व डोह खोल असल्याने सिद्धेश मात्र पाण्यात बुडाला.सिद्धेश बुडाल्याचे बघताच मित्रांनी त्याच्या घरी धाव घेतली व झालेल्या घटनेबद्दल सिद्धेशच्या कुटुंबियांना सांगितले. काही क्षणातच ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. गावकºयांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व शोधकार्य सुरू केले. यावेळी परिसरातील पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाचारण करण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी