शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

रत्नागिरीत राष्ट्रवादीला धक्का, माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर शिवसेनेत

By मनोज मुळ्ये | Updated: January 10, 2024 12:32 IST

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी बुधवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी झालेल्या ...

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी बुधवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात उदय सामंत यांचे वडील रवींद्र सामंत आणि त्यांच्या मातोश्री स्वरुपा सामंत आणि उद्योजक किरण सामंत यांनी सुदेश मयेकर यांचे स्वागत केले. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप, शहराध्यक्ष बिपीन बंदरकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.सुदेश मयेकर यांनी गेल्याच महिन्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मंत्री सामंत यांच्या मातोश्री स्वरुपा सामंत यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात त्यांनी सुदेश मयेकर यांना उदय सामंत यांच्यासोबत येण्याची साद घातली. तू उदय आणि किरणचा जवळचा मित्र आहे. तू त्यांच्यासोबतच राहावेस, अशी साद त्यांनी घातली. त्यामुळे सुदेश मयेकर यांचा प्रवेश निश्चित मानला जात होता.आज, बुधवारी मंत्री सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. यावेळी रवींद्र तथा अण्णा सामंत, स्वरुपा सामंत, किरण सामंत, बाबू म्हाप, बिपीन बंदरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना