शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गुढी पाडव्यानिमित्त रत्नागिरीत ढोलताशांच्या गजरात शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 16:18 IST

मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्यानिमित्त रत्नागिरी शहरामध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. ढोलताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या शोभायात्रांमध्ये विविध प्रकारच्या वेशभूषा करुन मनमोहक देखावे त्यात सहभागी झाले होते.

ठळक मुद्देगुढी पाडव्यानिमित्त रत्नागिरीत ढोलताशांच्या गजरात शोभायात्राविविध प्रकारच्या वेशभूषा, मनमोहक देखावे

रत्नागिरी : मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्यानिमित्त रत्नागिरी शहरामध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. ढोलताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या शोभायात्रांमध्ये विविध प्रकारच्या वेशभूषा करुन मनमोहक देखावे त्यात सहभागी झाले होते.गुढी पाडव्यानिमित्त शहरातील मारुती मंदिर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मिरवणूक काढली होती. यामध्ये अनेक चित्ररथ विविध फुलांनी सजविलेले होते. भैरी मंदिरातून निघालेल्या यात्रेत अनेक चित्ररथ सहभागी झाले.

सकाळी भैरी मंदिरात दोन गुढींची पूजा करण्यात आली. विश्वस्त मंडळी, ग्रामस्थ, मानकरी यांच्या उपस्थितीत गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर मंदिरातून सवाद्य श्री भैरीची मूर्ती व पालखी बाहेर काढण्यात येऊन स्वागतयात्रेला प्रारंभ झाला. ही शोभायात्रा खालची आळी, गोखलेनाका, बसस्थानक, जयस्तंभ अशी शोभायात्रा काढली होती.मारुती मंदिर येथून निघालेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची शोभायात्रा आणि भैरी मंदिरातून काढण्यात आलेली शोभायात्रेची जयस्तंभ येथे भेट झाली. तेथून या दोन्ही शोभायात्रा एकत्रितरित्या रामआळीमार्गे पतितपावन मंदिरमध्ये आल्यानंतर तेथे सांगता करण्यात आली. कुवारबाव येथे कुवारबाव पंचक्रोशी ब्राम्हण सभेतर्फे शोभायात्रा काढण्यात आली.

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGudi Padwa 2018गुढीपाडवा २०१८