शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

नाणार रद्दचे रत्नागिरीत शिवसेनेकडून जंगी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 10:54 IST

राजापूर तालुक्यातील नाणार येथे प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प रद्द केल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी  केली. या घोषणेनंतर आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीतील शिवसैनिकांनी पेढे वाटून, फटाके वाजवून या निर्णयाचे जंगी स्वागत केले.

ठळक मुद्देनाणार रद्दचे रत्नागिरीत शिवसेनेकडून जंगी स्वागतशिवसैनिकांनी पेढे वाटून, फटाके वाजवले

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणार येथे प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प रद्द केल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी  केली. या घोषणेनंतर आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीतील शिवसैनिकांनी पेढे वाटून, फटाके वाजवून या निर्णयाचे जंगी स्वागत केले.राजापूर तालुक्यातील नाणारसह लगतच्या १४ गावांमध्ये शासनाने रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित केला होता. येथील काही ग्रामस्थांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. ग्रामस्थांच्या विरोधाला शिवसेनेने पाठिंबा देत प्रकल्प रद्द करण्याचा रेटा सुरूच ठेवला होता. शिवसेनेच्या विरोधामुळे निवडणुकीतील युतीबाबतही साशंकता निर्माण झाली होती. भाजपबरोबर युती करताना रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याची अट शिवसेनेने घातली होती. ही अट मान्य करून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.नाणार येथील प्रकल्प रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. त्याचवेळी अधिग्रहीत जमीन परत करणार असून, जिथे स्वागत होईल तिथे हा प्रकल्प उभारला जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले आहे. नाणार येथील हा प्रकल्प रद्द केल्याची घोषणा करताच रत्नागिरीतील खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयाबाहेर आमदार राजन साळवी यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.

यावेळी त्यांचेसमवेत संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, राजेंद्र महाडिक, राहुल पंडित, प्रदीप साळवी, संजय साळवी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी राजन साळवी यांनी सांगितले की, हा प्रकल्प रद्द झाला पाहिजे अशी शिवसेनेची पहिल्यापासूनची भूमिका होती. आज हा प्रकल्प रद्द झाल्याने कोकणी जनता आनंदीत झाली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पाची अधिसूचना रद्द केलेल्या घोषणेचे आम्ही स्वागत करत आहोत. शिवसेना पक्षप्रमुखांनी कोकणी जनतेला वचन दिले होते ते पूर्ण झाले असल्याचेही साळवी यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरी