शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

स्वप्न आमदाराचे पण नगराध्यक्षपदापासून सुरुवात करेन, उमेश सकपाळ यांचे स्पष्टीकरण

By संदीप बांद्रे | Updated: August 14, 2023 18:17 IST

चिपळूण : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सर्व काही मलाच पाहिजे अशा प्रवृत्तीची लोक आहेत. त्यामुळे मी एकनाथ शिंदे गटात ...

चिपळूण : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सर्व काही मलाच पाहिजे अशा प्रवृत्तीची लोक आहेत. त्यामुळे मी एकनाथ शिंदे गटात प्रवेश करत आहे. खरं तर माझे स्वप्न आमदारकीचे आहे, पण पक्षाने संधी दिली तर नगराध्यक्षपदापासून सुरुवात करेन, अशी अपेक्षा माजी नगरसेवक उमेश सकपाळ यांनी सोमवारी (१४ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत व्यक्त केली.उमेश सकपाळ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. ते म्हणाले की, मी शिवसेना हे चार अक्षर आणि धनुष्यबाण हे चिन्ह सोडून कुठेही गेलेलो नाही. मला शिवसेनेचे विभागप्रमुख ते शहरप्रमुख पदापर्यंत काम करण्याची संधी मिळाली. नगरसेवक झालो. ठाकरे गटात असताना मला अनेकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण मी संघर्षातून पुढे आलो आहे. त्यामुळे त्रासाचे मला काहीच वाटले नाही.चिपळूण शहरात महापूर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिपळूणच्या मदतीला धावून आले. ते शिवसेनेतून बाजूला झाल्यानंतर त्यांचा खंदा कार्यकर्ता म्हणून त्यांचे फलक लावले. मी ठाकरे गटाची साथ सोडणार नव्हतो पण महापुराच्या काळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी चिपळूणला योग्य ती मदत केली नाही. त्यामुळे लोकांमध्येही नाराजी आहे.कार्यकर्त्यांच्या हाताला काम पाहिजे. परंतु, ठाकरे शिवसेनेत सध्या सर्वकाही मलाच पाहिजे अशा प्रवृत्तीचे लोक आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून मी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षण व पक्षाच्या माध्यमातून संधी मिळाली तर प्रथम मी चिपळूण शहराचा नगराध्यक्ष होईन. नगराध्यक्षपदाची परीक्षा पास झाल्यानंतर मला आमदार होण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.सकपाळ यांचा शिंदे गटात उद्या प्रवेशउमेश सकपाळ यांनी शिवसेनेच्या शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते एकनाथ शिंदे गटात उद्या १५ ऑगस्टला जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता त्यांच्या संपर्क कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे