शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : शिवसेना तालुकाप्रमुखांना राष्ट्रवादी आमदाराच्या पुतण्याची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 15:28 IST

खेड तालुक्यातील नातूनगर घागवाडी येथे शिवसेना गटप्रमुख संजय घाग यांच्याकडे गेलेल्या तालुकाप्रमुख भालचंद्र तथा राजा बेलोसे यांना किरकोळ कारणावरून आमदार संजय कदम यांच्या पुतण्याने सहकाऱ्यांसह शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी संग्राम कदम यांच्यासह पंचवीस ते तीस जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देशिवसेना तालुकाप्रमुखांना राष्ट्रवादी आमदाराच्या पुतण्याची मारहाणपंचवीस ते तीस जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा

खेड : तालुक्यातील नातूनगर घागवाडी येथे शिवसेना गटप्रमुख संजय घाग यांच्याकडे गेलेल्या तालुकाप्रमुख भालचंद्र तथा राजा बेलोसे यांना किरकोळ कारणावरून आमदार संजय कदम यांच्या पुतण्याने सहकाऱ्यांसह शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी संग्राम कदम यांच्यासह पंचवीस ते तीस जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना तालुकाप्रमुख राजा बेलोसे यांनी सोमवारी पोलिस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार दिली आहे. त्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, बेलोसे हे रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नातूनगर घागवाडी याठिकाणी शिवसेना गटप्रमुख संजय घाग यांच्या घरी जेवणासाठी गेले होते. त्यांची स्कॉर्पिओ गाडी रस्त्याच्या बाजूला उभी होती. यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकचा चालक सतत हॉर्न देऊ लागला. त्यावेळी बेलोसे यांनी दोनच मिनिटात गाडी पुढे घेतो असे सांगितले.तसेच त्याला तुझ्याकडे पास आहे का? असे विचारले. याचा राग येऊन तेथील अजय बेलोसे यांनी राजा बेलोसे यांना गाडी बाजूला न घेतल्यास डंपर गाडीवर चढवेन अशी धमकी देऊन आमदार संजय कदम यांचा पुतण्या संग्राम कदम तसेच २० ते २५ जणांना त्याठिकाणी बोलावले.

यावेळी सर्वांनी राजा बेलोसे यांना शिवीगाळ, धक्काबुक्की व हाताने मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी राजा बेलोसे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी खेड पोलीसांकडून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी