शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक : कॉँग्रेसमधील गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 13:03 IST

रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देऊन राज्यातील महाविकास आघाडीचे सत्ता समीकरण राबविण्याच्या बाजूने स्थानिक कॉँग्रेसमधील एक गट कार्यरत आहे, तर राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी दाखल केलेल्या मिलिंद कीर यांना पाठिंबा देण्याबाबत कॉँग्रेसमधील दुसरा गट सक्रिय आहे. परिणामी कॉँग्रेसमध्ये निर्माण झालेली गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर पडणार का, या चर्चेला आता उधाण आले आहे.

ठळक मुद्देकॉँग्रेसमधील गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर?पदमुक्तीसह पाठिंब्यावरून मतभेद

रत्नागिरी : रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देऊन राज्यातील महाविकास आघाडीचे सत्ता समीकरण राबविण्याच्या बाजूने स्थानिक कॉँग्रेसमधील एक गट कार्यरत आहे, तर राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी दाखल केलेल्या मिलिंद कीर यांना पाठिंबा देण्याबाबत कॉँग्रेसमधील दुसरा गट सक्रिय आहे. परिणामी कॉँग्रेसमध्ये निर्माण झालेली गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर पडणार का, या चर्चेला आता उधाण आले आहे.रत्नागिरीच्या नगराध्यक्ष पदावरून शिवसेनेचे राहुल पंडित यांनी सहा महिन्यांपूर्वीच राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. पद रिक्त असलेल्या काळात शिवसेनेचे तालुकाप्रमुख नगरसेवक बंड्या साळवी यांनी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे. आता येत्या २९ डिसेंबरला थेट नगराध्यक्ष निवडणूक होत आहे.या निवडणुकीत शिवसेनेचे तालुकाप्रमुख व प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप प्रताप तथा बंड्या साळवी यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर व भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी उमेदवारी दाखल केली आहे. मनसेचे रूपेश सावंत व अपक्ष मुकुंद जोशी हेसुध्दा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.राजकीय समीकरणे सातत्याने बदलत आहेत. या पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडीतर्फे अर्ज भरण्याऐवजी मिलिंद कीर हे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांना शहर विकास आघाडीतील राष्ट्रीय कॉँग्रेस, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन विकास आघाडी व अन्य घटक पक्षांचा पाठिंबा राहणार आहे.कॉँग्रेसने या निवडणुकीत प्रथम आघाडीपासून अलिप्तता दाखवित स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर स्वतंत्र उमेदवार उभा करण्यास कॉँग्रेसमधील एका गटाने विरोध केला. हा गट महाविकास आघाडीच्या दिशेने जात शिवसेनेकडे झुकत असल्याचे दिसताच जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार मिलिंद कीर यांना काँग्रेस पाठिंबा देत असल्याचे पत्रच दिले आहे.१७ ची बैठक महत्त्वाचीराष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यानंतर कॉँग्रेसने पुन्हा भूमिका बदलली आहे. राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावी किंवा नाही, याबाबतचा निर्णय लांजा नगर पंचायत निवडणुकीत आघाडी करण्याबाबतच्या निर्णयावर अवलंबून आहे. १७ डिसेंबरला कॉँग्रेस व राष्ट्रवादीची या विषयावर संयुक्त बैठक होणार असून, त्यावेळी रत्नागिरीत राष्ट्रवादीला पाठिंबा द्यायचा की नाही, हे ठरणार आहे.

या सर्व राजकीय घडामोडींचा आढावा घेता कॉँग्रेसमधील गटबाजी उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका गटाचे सहकार्य शिवसेनेचे उमेदवार बंड्या साळवी यांना मिळण्याची शक्यता आहे. परिणामी कॉँग्रेसमधील ही गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर पडण्याची शक्यता अधिक आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी