शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत शिवसेनेने बंद पाडली दुकाने, अकराजणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 12:58 IST

Bharat Bandh, Farmer strike, Ratnagiri, Police शेतकरी कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी रत्नागिरी बाजारपेठेत उघडलेली दुकाने शिवसैनिकांनी सक्तीने बंद केली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सक्तीमुळे व्यापाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे रत्नागिरीत शिवसेनेने बंद पाडली दुकाने, अकराजणांवर गुन्हे दाखलभारत बंदला संमिश्र प्रतिसाद, व्यापारी बंदपासून दूर

रत्नागिरी : शेतकरी कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी रत्नागिरी बाजारपेठेत उघडलेली दुकाने शिवसैनिकांनी सक्तीने बंद केली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सक्तीमुळे व्यापाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी मंगळवार ८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या बंदला देशभरातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्रातही सकाळपासून कडकडीत बंदला सुरुवात झाली आहे.

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी कांदा, मका, बटाटा आणि इतर शेतमालाचा लिलाव बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे मंगळवारी रत्नागिरीत भाजीपाल्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.माथाडी कामगारही काम बंद ठेवून या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. तर शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा म्हणून शिवसेना पुरस्कृत रिक्षा संघटना संपात उतरली आहे. मंगळवारी सकाळी रत्नागिरी बाजारपेठेतील दुकाने उघडण्यात आली होती. मात्र, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रमोद शेरे, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, नगरसेवक निमेश नायर, विजय खेडेकर, संजय साळवी, बंटी कीर आदी शिवसैनिक बाजरपेठेतील दुकाने बंद करण्यासाठी फिरत होते. बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बाजारपेठेतील दुकाने सक्तीने बंद करण्यास भाग पाडली.दरम्यान, या संपात सहभागी होण्याचा निर्णय ऐश्चिक ठेवण्यात आला होता. त्यामुळे अनेकांनी आपली दुकाने उघडली होती. शिवसैनिकांनी ही दुकाने बंद करण्यास भाग पाडले. शहरात दुकाने बंद करण्यासाठी फिरणाऱ्या ११ शिवसैनिकांवर पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायदा ६८ अन्वये ताब्यात घेऊन कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी दिली.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदFarmer strikeशेतकरी संपRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिस