शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
2
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
3
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
4
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
5
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
6
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
7
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
8
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
9
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
10
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
11
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
12
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
13
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
14
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
15
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
16
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
17
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
18
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
19
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
20
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

‘शिपयार्ड’चे कर्मचारी वाऱ्यावर

By admin | Updated: August 28, 2015 23:41 IST

आर्थिक मंदीचे कारण : युनियनकडून कणखर भूमिका हवी

दापोली : तालुक्यातील उसगाव येथील भारती शिपयार्ड कंपनी व्यवस्थापनाने आर्थिक मंदीचे कारण पुढे करून सामान्य कर्मचाऱ्यांना वेठीस धरले आहे. या प्रकरणी कामगार युनियनने कर्मचाऱ्यांच्या बाजूने कणखर भूमिका न घेतल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.गेल्या तीन वर्षापूर्वीपासूनचा दिवाळी बोनस, ओव्हरटाईम, फरकाच्या रकमा, प्रमोशन तसेच मागील सहा महिन्यांचा पगार कंपनीने थकवल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुलांच्या शिक्षणाची, घरातील व्यक्तींच्या आजारपणाची, तसेच इतर गरजांची पूर्तता कोठून करायची हा यक्ष प्रश्न कामगारांपुढे आवासून उभा ठाकलेला आहे. मात्र, भारतीय कामगार सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी भारती शिपयार्ड कंपनीमध्ये स्थापन केलेल्या युनियन कमिटीस याचे कोणतेच सोयरसुतक नाही, असे दिसते. गेल्या ३ वर्षांपासून कामगार युनियन कमिटीने कामगारांच्या कोणत्याही समस्या जाणून घेतलेल्या नाहीत. तसेच कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही. याउलट कामगार कमिटीने कंपनी व्यवस्थापनाशी जवळीक साधून आपल्या स्वत:चे प्रमोशन करून घेतले. तसेच थकीत पगारापैकी आपल्या स्वत:च्या काही रकमा काढून घेतल्या. कामगार कमिटीच्या नावाखाली कमिटी अध्यक्षांनी स्वत:चे नावावरती हाऊस किपिंंगचे कान्टॅ्रक्ट घेऊन लाखो रूपयांचा फायदा करून कामगार बांधवांची फसवणूक केली आहे. एखादा कामगार युनियन कमिटीकडे जाब विचारावयास गेल्यास त्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे कामगारांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. कामगार युनियन कमिटीचा बेजबाबदारपणा, त्यांची हुकुमशाही यामुळे कंपनीत अनुचित प्रकार घडत आहेत. या सर्व प्रकरणात भारतीय कामगार सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्वरीत लक्ष घालून कामागारांवर होत असणाऱ्या अन्यायाची चौकशी करावी. कामगारांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये. अन्यथा संतप्त कामागारांकडून काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास कंपनी प्रशासन, लेबर कमिशन जबाबदार राहतील. या सर्वप्रकाराची संबंधित शासकीय अ$ि$िधकाऱ्यांनी सखोल चौकशी करून कामगारांना त्यांचा न्याय हक्क मिळवून द्यावा अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)