शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रत्नागिरीत महायुतीमध्ये बेबनाव, राजकारणाची दिशा बिघडली; शिंदेसेना-भाजपमध्ये वाद विकोपाला

By मनोज मुळ्ये | Updated: August 23, 2024 18:34 IST

महाविकास आघाडीचा रस्ता मोकळा हाेतोय

मनोज मुळ्येरत्नागिरी : राजकारण कधीही एकसारखे राहत नाही, ही बाब रत्नागिरी जिल्ह्यात आता प्रकर्षाने पुढे येत आहे. आधीच महायुती फारशी एकत्र नव्हती आणि लोकसभा निवडणुकीनंतर शिंदेसेना आणि भाजपमधील ताण अधिकच वाढले आहेत. त्यातल्या त्यात गुहागर विधानसभा मतदारसंघ वगळता इतर चारही मतदारसंघात शिंदेसेना आणि भाजपमध्ये वाद वाढलेले दिसतात. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तीन पक्ष दोन वर्षांपूर्वी एकत्र आले. मात्र जिल्ह्यात अजूनही त्यांचे एकत्रीकरण झालेले नाही. लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेने पहिल्यापासून या जागेसाठी दावा केला होता. आधी ही जागा शिवसेनेकडेच असल्याने ती शिंदेसेनेसाठी सोडली जाईल, असे वाटत होते. मात्र उमेदवारी अर्ज भरायची सुरुवात झाल्यानंतर ही जागा अचानक भाजपसाठी सोडण्यात आली. हा शिंदेसेनेसाठी धक्का होता.त्यातच या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूण या तीन ठिकाणी महायुतीला मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे शिंदेसेनेने अपेक्षित साथ दिली नसल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने केला जात आहे. त्यामुळेच महायुतीतील तेढ वाढली आहे.मित्रपक्षाकडून सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप खासदार नारायण राणे आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी अनेकदा केला आहे. त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत भाजपने घेतलेली आक्रमक भूमिका पाहता विधानसभेला शिंदेसेनेच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी भाजप करत आहे का, अशी शंका येण्यास वाव आहे.रत्नागिरीसारखेच चित्र राजापूर आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघातही आहे. महायुतीत लोकसभेला दक्षिण रत्नागिरीप्रमाणेच उत्तर रत्नागिरीतही वाद सुरू झाले. रायगड लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यानच माजी मंत्री रामदास कदम यांनी भाजप तोफ डागली होती.दापोली विधानसभा मतदारसंघात भाजपकडून ढवळाढवळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केली होता आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली होती. ते आमदार योगेश कदम यांना बाजूला ठेवून काम करत असल्याचा आरोप कदम यांनी केला होता. माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर दापाेलीतील भाजप अधिक सक्रिय झाली आहे. त्यातूनच हा वाद पुढे आला आहे. गेल्या आठवड्यात या वादाने तोंड फाेडण्याची भाषा करेपर्यंतचे टोक गाठले आहे. त्यामुळे महायुतीतील ताण अधिकच वाढला आहे. रामदास कदम यांच्या आरोपांना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढला आहे. रामदास कदम यांनी ज्या पद्धतीने टीका केली, त्याचा परिणाम म्हणून भाजपकडून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी कदम यांचा निषेध करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदेसेनेकडूनही जशास तसे उत्तर देण्याची भाषा वापरण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर असताना होणारे हे वाद, ते मिटविण्यासाठी न हाेणारे प्रयत्न, स्थानिक पातळीवर दिले जाणारे खतपाणी हे सारे पाहता विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत की काय, अशी शंका येत आहे. केवळ मंत्री उदय सामंत यांनीच वाद मिटविण्याची भूमिका घेतली. वरिष्ठ पातळीवरून मात्र प्रयत्न झाले नाहीत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाRamdas Kadamरामदास कदम