शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय निर्बंधाचे पालन करीत शिमगोत्सव शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 18:04 IST

Holi Ratnagiri- कोरोनामुळे प्रशासनाने निर्बंध जारी केले आहेत. कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भाविकांकडून प्रशासनाच्या सूचनेचे पालन करीत शिमगोत्सव शांततेत साजरा करण्यात येत आहे. रविवारी मुख्य होळी तोडण्यात आली. सोमवारी सर्वत्र सकाळी होम करण्यात आला.

ठळक मुद्देशासकीय निर्बंधाचे पालन करीत शिमगोत्सव शांततेत१३७७ ग्रामदेवतेच्या पालख्या ग्रामप्रदक्षिणेला बाहेर

रत्नागिरी : कोरोनामुळे प्रशासनाने निर्बंध जारी केले आहेत. कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भाविकांकडून प्रशासनाच्या सूचनेचे पालन करीत शिमगोत्सव शांततेत साजरा करण्यात येत आहे. रविवारी मुख्य होळी तोडण्यात आली. सोमवारी सर्वत्र सकाळी होम करण्यात आला.जिल्ह्यात फाक पंचमीपासून शिमगोत्सवास प्रारंभ झाला. जिल्ह्यात ११६७ सार्वजनिक तर ३०७९ खासगी होळ्या उभ्या करण्यात आल्या आहेत. शिमगोत्सवात ग्रामदेवतेच्या पालख्या रूपे लावून सजविण्यात येतात. काही पालख्या फाकपंचमी नंतर तर काही होळी पौर्णिमेला ग्रामप्रदक्षिणेला बाहेर पडतात. पैकी काही पालख्या रंगपंचमीनंतर देवळात परतात. तर काही गावातून चैत्रीपर्यंत पालखी उत्सव साजरा केला जातो. त्याप्रमाणे जिल्ह्यातील १३७७ ग्रामदेवतेच्या पालख्या ग्रामप्रदक्षिणेला बाहेर पडल्या आहेत.कोरोनामुळे यावर्षी पालखी घरोघरी येणार नसली तरी सहाणेवरच थांबणार आहे. सामाजिक अंतर ठेवून पालखी दर्शनाचे नियोजन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे. ग्रामीण भागातही शासनाच्या नियमावलींचे पालन करून शिमगोत्सव साजरा करण्यात येत आहे. होळीसाठी भाविकांकडून नारळ न स्वीकारता अवघ्या गावाचा एकच नारळ अर्पण करून गाऱ्हाणे घालण्यात आले. पोलीस प्रशासनाकडूनही उत्सवावर करडी नजर ठेवण्यात आली आहे. महत्वपूर्ण देवस्थानाबाहेर पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे.श्री भैरीची रथातून ग्रामप्रदक्षिणाबारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी बुवांचा शिमगोत्सव सुरू झाला असून, श्री भैरीदेव ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडले आहेत. मात्र कोरोनामुळे पालखीची ग्रामप्रदक्षिणा रथातून सुरू आहे. पालखी नाचविण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. दि.२ एप्रिल पर्यंत प्रदक्षिणा पूर्ण करून रात्री १२ वाजता पालखी श्री भैरी मंदिरात परतणार आहे. 

टॅग्स :HoliहोळीRatnagiriरत्नागिरीReligious programmeधार्मिक कार्यक्रम