शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

शमिका भिडे हिला देवल स्मृती पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 19:43 IST

रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे गोविंद बल्लाळ देवल स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा पुरस्कार कोकणकन्या शमिका भिडे हिला जाहीर झाला ...

ठळक मुद्देशमिका भिडे हिला देवल स्मृती पुरस्कारगोविंद बल्लाळ देवल स्मृतिप्रित्यर्थ मराठी नाट्य परिषदेतर्फे पुरस्कार

रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे गोविंद बल्लाळ देवल स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा पुरस्कार कोकणकन्या शमिका भिडे हिला जाहीर झाला आहे. दि. १४ जून रोजी यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा- मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण होणार आहे.मराठी रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट गायक-अभिनेत्रींसाठी महाराष्ट्र शासन पुरस्कृत बालगंधर्व पुरस्कार, महाराष्ट्र कल्चरल सेंटर पुरस्कृत ज्योत्स्ना भोळे गौरव पुरस्कार, गणरंग पुरस्कृत माणिक वर्मा पुरस्कार आणि सौ. मंगला पाटकर पुरस्कृत कै. वसंत देसाई स्मृती पुरस्कार मिळून दरवर्षी संयुक्त पुरस्कार दिला जातो. यावर्षी या मानाच्या पुरस्कारासाठी रत्नकन्या शमिकाची निवड झाली आहे.इयत्ता चौथीपासून शमिकाने रत्नागिरीत प्रसाद गुळवणी व नंतर मुग्धा सामंत - भट यांच्याकडे गायनाचे धडे गिरविण्यास सुरूवात केली. शिक्षण सुरू असतानाच शमिका एका मराठी वाहिनीवरील सारेगमपमध्ये सहभागी झाली होती. त्याचवेळी गायक अवधूत गुप्ते यांनी शमिकाला कोकणकन्या ही नवीन ओळख करून दिली होती.

गेली आठ वर्षे शमिका जयपूर घराण्याच्या अश्विनी भिडे-देशपांडे यांच्याकडे मुंबईत राहून गायनाचे शिक्षण घेत आहे. कलर्स वाहिनीवरील सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमातही ती सहभागी झाली होती.गायनाचे शिक्षण सुरू असतानाच शमिकाने रंगभूमीवर पाऊल ठेवत पहिल्यांदाच संगीत मेघदूत नाटकात अभिनेत्रीची भूमिका साकारली. याशिवाय नाट्यसंपदा व यशवंत देवस्थळी निर्मित चि. सौ. कां. रंगभूमी नाटकात काम करीत आहे. गायिका व अभिनेत्री असा दुहेरी प्रवास सध्या तिने सुरू केला आहे. गौरव कोरगावकर (गोवा) यांच्याशी काही दिवसांपूर्वीच तिचा वाङ्निश्चय झाला असून, डिसेंबरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकsindhudurgसिंधुदुर्ग