जिल्ह्यात ५ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:31 IST2021-04-08T04:31:46+5:302021-04-08T04:31:46+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात उष्णतेमध्ये भयंकर वाढ झाल्याने पाण्याची पातळी खोलवर चालली असल्याने, भीषण पाणीटंचाई सुरू झाली ...

Severe water shortage in 5 wadis in the district | जिल्ह्यात ५ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई

जिल्ह्यात ५ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात उष्णतेमध्ये भयंकर वाढ झाल्याने पाण्याची पातळी खोलवर चालली असल्याने, भीषण पाणीटंचाई सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४ गावांतील ५ वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याने, येथील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये डोंगरकपारीत वसलेल्या धनगरवाड्यांमध्ये दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे धनगर वस्त्यांतील जनतेला कळशीभर पाण्यासाठी कित्येक मैल डोंगर-दऱ्यातून पायपीट करावी लागते. येथील लोकांना तर सोडाच, जनावरांनाही पाणी मिळत नसल्याने ती तडफडू लागली आहेत.

खेड तालुक्यातील खवटी गावातील खालची धनगरवाडीमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवू लागल्याने, लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. खवटी-खालची धनगरवाडीनंतर आता वरची धरनगरवाडी, आंबवली येथील भिंगारा, लांजा तालुक्यातील चिंचुर्टीमधील धावडेवाडी येथे दरवर्षी भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्वरूपानंदनगर येथील २४ विहिरींचे पाणी दूषित झाल्याने त्यांनाही टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टंचाईग्रस्तांना ३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, तोही अपुरा पडत असल्याची ओरड ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.

Web Title: Severe water shortage in 5 wadis in the district