शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सत्तर वर्षांच्या शेवंती पवार झाल्या बिनविरोध सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 12:34 IST

Chiplun sarpanch Ratnagiri- चिपळूण तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ७० वर्षीय शेवंती बब्या पवार विराजमान झाल्या आहेत. वयोवृद्ध असतानाही गावच्या विकासासाठी राजकीय प्रक्रियेत सहभागी झालेल्या पवार यांची इच्छाशक्ती हा सर्वत्र कौतुकाचा विषय झाला आहे.

ठळक मुद्देसत्तर वर्षांच्या शेवंती पवार झाल्या बिनविरोध सरपंचचिपळूणच्या ओवळी ग्रामपंचायतीत घडली चकीत करणारी घटना

चिपळूण : तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ७० वर्षीय शेवंती बब्या पवार विराजमान झाल्या आहेत. वयोवृद्ध असतानाही गावच्या विकासासाठी राजकीय प्रक्रियेत सहभागी झालेल्या पवार यांची इच्छाशक्ती हा सर्वत्र कौतुकाचा विषय झाला आहे.तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. ओवळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गाव विकास पॅनेलने एकहाती ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दिनेश शिंदे यांनी हॅट् ट्रिक साधली. प्रभाग क्रमांक १ मध्ये सदस्य पदाकरिता अनुसूचित जमाती असे आरक्षण पडले होते. येथील आदिवासी समाजाने ७० वर्षीय शेवंती पवार यांना बिनविरोध निवडून देण्याचा निर्णय घेतला.यापूर्वीही शेवंती पवार यांनी सदस्यपद भूषविले आहे. आता सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. या गावातून अनुसूचित जमाती प्रवर्गातून एकमेव निवडून आलेल्या शेवंती पवार यांना सरपंचपदाची लॉटरी लागली आहे.

गाव विकास पॅनलच्या विजयी उमेदवारांचे व सरपंच पवार यांचे आमदार शेखर निकम यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी दिनेश शिंदे, निकिता शिंदे, माधवी शिंदे, संपदा बोलाडे, केशव कदम उपस्थित होते.

टॅग्स :sarpanchसरपंचChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरी