शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

सत्तर टक्क्यांहून अधिक निधी फक्त रस्त्यावरच खर्च

By admin | Updated: July 24, 2014 23:28 IST

जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी २०१३-१४ या वर्षात आपल्या विकास कामांपैकी सर्वाधिक खर्च रस्ता दुरूस्ती व डांबरीकरण याच्यावर केला आहे

रत्नागिरी : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी २०१३-१४ या वर्षात आपल्या विकास कामांपैकी सर्वाधिक खर्च रस्ता दुरूस्ती व डांबरीकरण याच्यावर केला आहे. अर्थात तरीही जिल्ह्यातील रस्त्यांची स्थिती दयनीयच आहे. सर्व आमदारांचा मिळून सत्तर टक्क्यांहून अधिक निधी फक्त रस्त्यांच्या कामावरच खर्च झाला आहे. पाखाडी, गटारे, संरक्षक भिंती, एखाददुसरे समाजमंदिर, सभागृह आदी कामे वगळता आरोग्य, शिक्षण यासारख्या प्रमुख गोष्टी मात्र दुर्लक्षित दिसतात. आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी २ कोटी रूपयांची तरतूद असून हा निधी जिल्हा नियोजन समितीकडून वितरीत केला जातो. २०१३ - १४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील पाचही आमदारांनी सुचविलेल्या कामांमध्ये सर्वाधिक महत्त्व रस्ता दुरूस्ती आणि पाखाडी यांना दिलेले आहे. पाच आमदारांच्या दहा कोटीपैकी ७ कोटी ३२ लाखा ७७ हजार इतकी रक्कम आमदारांनी २४९ रस्ते, पाखाडी अशाच कामांसाठी खर्च केली आहे. कोणत्याही भागाच्या विकासात दळणवळणाचे महत्त्व अधिक असल्याने रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र तरीही जिल्ह्यातील असंख्य रस्त्यांची आताच दुरवस्था झालेली दिसून येते. जिल्ह्यात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे सर्वच आमदारांनी पाणीपुरवठ्यावर भर दिला आहे. उदय सामंत यांनी सर्वाधिक कामे (११) सुचविली असून त्यासाठी प्रशासकीय मान्यतेची रक्कम २९.७३ लाख इतकी आहे. त्याखालोखाल भास्कर जाधव यांनी सात कामे (१६.३१ लाख) सुचविलेली आहेत. आमदार सदानंद चव्हाण यांनीही पाणीपुरवठ्यावर भर देत १२ विंधनविहीरीची कामे सुचविली असून त्यासाठी ७.४५ लाख रूपयांची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. राजन साळवी यांच्याही ३ कामांसाठी ३.७८ लाख रूपयांची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. सुर्यकांत दळवी यांनी मात्र पाणीपुरवठ्यासाठी एकही रूपया दिलेला नाही. याव्यतिरिक्त समाजमंदिरे, सभागृहे, पिकअपशेड आदी कामांचा समावेश आहे. अर्थात आरोग्य, शिक्षण, क्रीडा यासारख्या महत्त्वाच्या विषयांसाठी निधीची तरतूद करण्याकडे बहुतेक आमदारांनी दुर्लक्ष केले आहे. पाचपैकी तीनच आमदारांनी क्रीडा क्षेत्रासाठी निधी दिला आहे. (प्रतिनिधी) उदय सामंत - रत्नागिरी एकूण कामे७१ पाणीपुरवठा २९.७३ (११) रस्ता, पाखाडी १३७.६३ (५२) संरक्षक भिंती २.०० (१) सांस्कृतिक रंगमंच १.४३ (१) क्रीडा साहित्य१.९८ (१) शिक्षण २.२९ (१)पिकअपशेड६.६६ (२) एस. टी. प्रसाधनगृह १९.९९ (२) वैशिष्ट्यपूर्ण कामे ----- एकूण खर्च : १९९.७३ एकूण कामे९५पाणीपुरवठा३.७८ (३) रस्ता, पाखाडी १२३.५१ (८४)संरक्षक भिंती ५.५४ (३) सभागृह २.५० (१)क्रीडा २.०० (२) शिक्षण ---इतर०.९२ (२) शासकीय कार्यालयांना संगणक वैशिष्ट्यपूर्ण कामे -----एकूण खर्च २१२.८८ एकूण कामे ८२ पाणीपुरवठा ७.४५ (१२) रस्ता, पाखाडी १९०.६६ (६०) संरक्षक भिंती ११.९४ (५) समाजमंदिर व सभागृह ७.८५ (२) क्रीडा १.०० (१) शिक्षण ५.०० (१) पिकअपशेड १.४६ (१) एकूण खर्च २१२.८८ सदानंद चव्हाण - चिपळूण एकूण कामे९५पाणीपुरवठा३.७८ (३) रस्ता, पाखाडी १२३.५१ (८४)संरक्षक भिंती ५.५४ (३) सभागृह २.५० (१)क्रीडा २.०० (२) शिक्षण ---इतर०.९२ (२) शासकीय कार्यालयांना संगणक वैशिष्ट्यपूर्ण कामे -----एकूण खर्च २१२.८८ सुर्यकांत दळवी - दापोलीएकूण कामे२९ पाणीपुरवठा --- रस्ता, पाखाडी १२३.५१ (२०) संरक्षक भिंती ---- समाजमंदिर व सभागृह ३०.८० (७) क्रीडा --- शिक्षण --- पिकअपशेड२.९४ (२) एकूण खर्च१५९.११ भास्कर जाधव - गुहागर एकूण कामे ५४ पाणीपुरवठा१६.३१ (७) रस्ता, पाखाडी १५७.४६ (३३) संरक्षक भिंती१४.९० (३) समाजमंदिर व सभागृह २६.७० (८) क्रीडा --- शिक्षण--- पिकअपशेड१.३३ एकूण खर्च २०६.०३