शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात शिकारीसाठी निघालेल्या सातजणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 14:34 IST

crimenews, hunting, ratnagirinews विनापरवाना बंदूक घेऊन दोन गाड्यातून जंगली प्राण्यांची शिकार करण्यास निघालेल्या तरुणांना शनिवारी मध्यरात्री २ वाजता चिपळूण शिरवली -मिरवणे रस्त्यावर चिपळूण पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून विनापरवाना २ बंदूक, २ चारचाकी वाहने, बॅटरी, जिवंत काडतुसे असा एकूण २ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीनजण फरार झाले असून, ७ जणांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देचिपळुणात शिकारीसाठी निघालेल्या सातजणांना अटक१० जणांवर गुन्हा दाखल, तीनजण फरार, चिपळूण पोलिसांची कारवाई

अडरे : विनापरवाना बंदूक घेऊन दोन गाड्यातून जंगली प्राण्यांची शिकार करण्यास निघालेल्या तरुणांना शनिवारी मध्यरात्री २ वाजता चिपळूण शिरवली -मिरवणे रस्त्यावर चिपळूण पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून विनापरवाना २ बंदूक, २ चारचाकी वाहने, बॅटरी, जिवंत काडतुसे असा एकूण २ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीनजण फरार झाले असून, ७ जणांना अटक करण्यात आली आहे.शनिवारी रात्री चिपळूण पोलीस गस्तीवर असताना चिपळूण येथील शिरवली - मिरवणे बायपास मार्गावर मध्यरात्री २ वाजता एका बोलेरो पिकअप गाडीतून काही तरुण जंगल परिसराकडे जात होते. त्यांची गाडी अडवून पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडे विनापरवाना २२ हजाराची १२ बोअरची डबल बॅरल बंदूक आढळली. त्याचबरोबर ३६० रुपये किमतीची जिवंत काडतुसे, १०० रुपये किमतीची बॅटरी आढळून आली. विनापरवाना बंदूक घेऊन हे तरुण जंगली प्राण्यांची शिकार करण्यास निघाले होते, असे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले.पोलिसांनी नीलेश अशोक लाड (३२), राजेश सत्यवान लाड, तेजस सत्यवान लाड आणि यश या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. नीलेश लाड याला अटक करण्यात आली असून, अन्य तिघेजण तेथून पळून गेले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून बोलेरो पिकअप गाडीसह एकूण १ लाख १२ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याच परिसरात त्यावेळी चिपळूण पोलिसांनी शिरवली फाटा येथे आणखी एक गाडी पकडली आहे. या गाडीतून ६ जण विनापरवाना बंदूक घेऊन जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी निघाले होते, असे चौकशीत पुढे आले. याप्रकरणी आदित्य अनंत चव्हाण, सोहम कैलास कदम, चेतन सदानंद रसाळ, अमर सदाशिव चव्हाण, संकेत अनंत चव्हाण, सागर अशोक वाघमारे या ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.त्यांच्याकडून १८ हजार रुपये किमतीची १२ बोअर सिंगल बॅरल बंदूक, ३६० रुपये किमतीची जिवंत काडतुसे, १०० रुपये किमतीची बॅटरी आणि टाटा सुमो गाडी असा एकूण १ लाख ६८ हजार ५१० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईनंतर अनेकांचे धाबे दणाणले असून, पोलिसांनी अन्य भागातही गस्त वाढवली आहे.ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक मन्सूर मणेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव जाधव, पोलीस कॉन्स्टेबल लालजी यादव,आशिष भालेकर, पपू केतकर आणि दिलीप जानकर या पोलीस पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी