शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
2
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
3
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
4
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
5
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
6
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
7
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
8
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
9
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
10
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
11
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
12
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
13
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
14
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
15
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
16
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
17
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
18
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
19
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
20
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शशांक पेडणेकर यांची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:26 IST

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील देवरूखनजीकच्या किरदाडी गावचे सुपुत्र शशांक हरिश्चंद्र पेडणेकर यांची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. संगमेश्वर ...

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील देवरूखनजीकच्या किरदाडी गावचे सुपुत्र शशांक हरिश्चंद्र पेडणेकर यांची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. संगमेश्वर तालुक्यात न्यायाधीश होण्याचा पहिला मान शशांक पेडणेकर यांना मिळाला आहे. पेडणेकर यांचा देवरूख बार संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा देवरूख न्यायालयाच्या सभागृहात पार पडला.

किरदाडी येथील शशांक पेडणेकर यांची कोल्हापूर येथे दिवाणी न्यायाधीश क. स्तर म्हणून नियुक्ती झाली आहे. अ‍ॅड. चंद्रकांत मांगले यांच्या हस्ते पेडणेकर यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच अ‍ॅड. पूनम चव्हाण यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. समीर आठल्ये यांनी केले. यावेळी अ‍ॅड. सीमा गिड्ये, संतोष सोमण, चंद्रकांत मांगले, पूनम चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सत्काराला उत्तर देताना पेडणेकर यांनी आपला पहिलाच व घरचा सत्कार असल्याचे सांगून हा एक अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगितले. यावेळी देवरूख बारचे वकील हळबे, गिरीष गानू, लक्ष्मीकांत जाधव, विजय पवार, राजेश शिंदे, चंद्रशेखर लिंबुकर, भक्ती मुरूडकर, शशांक मांगले उपस्थित होते.