शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 14:34 IST

CoronaVIrus Ratnagiri : प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. वर्षभराच्या कालावधीत ४१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला असून, एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात अडीच हजार अधिक रुग्ण सापडले असून, १५ दिवसांत तब्बल ३९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतेएप्रिल महिन्याच्या १५ दिवसात ३ हजार रुग्ण, तब्बल ३९ जणांचा मृत्यू

रहिम दलालरत्नागिरी : प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. वर्षभराच्या कालावधीत ४१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला असून, एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात अडीच हजार अधिक रुग्ण सापडले असून, १५ दिवसांत तब्बल ३९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पन्नाशीच्या वरील वयाच्या रुग्णांचा अधिक समावेश आहे. दुबईहून शृंगारतळी (ता. गुहागर) येथे आलेली व्यक्ती १८ मार्च, २०२० रोजी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. हा रुग्ण जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण ठरला होता. खेड तालुक्यातील कळंबणी रुग्णालयात ८ एप्रिल, २०२० रोजी कोरोना रुग्णाने अखेरचा श्वास घेतला होता. तो रुग्ण जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला बळी ठरला असून, तो अलसुरे (ता. खेड) गावातील होता.जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला असून, या निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. एप्रिल महिन्यामध्ये तर कोरोनाचा कहर वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरांसह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचा प्रसार सुरू झाला आहे.एप्रिल महिन्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. ज्यांना कोणतीच लक्षणे नाहीत, अशा लोकांकडून कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होत आहे. एप्रिलच्या १५ दिवसांत जिल्ह्यात २,५९२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले असून कोरोनाबाधितांची संख्या १३,६२१ झाली आहे. आतापर्यंत १०,०१५ रुग्ण बरे झाले आहेत. मृतांची संख्या आता ४१५ झाली असून त्यांचे प्रमाण ३.४ टक्के आहे.कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याआधी रत्नागिरी जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात १३० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबरमध्ये ५२ रुग्ण दगावले. मात्र त्यानंतर मृतांच्या संख्येत चांगली घट झाली. नोव्हेंबर २०२० पासून मार्च २०२१ पर्यंत हे प्रमाण मर्यादित होते. मात्र एप्रिल महिन्यात हे प्रमाण खूपच वाढले आहे. सध्यातरी लसीकरणाचा वेग वाढवणे हाच त्यावरचा उपाय मानला जात आहे.लसीकरण कमीलसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झाला तरी त्यातून धोका खूप कमी होतो. मात्र अजूनही लसीकरणाची गती वाढलेली नाही. त्यामुळे मृतांच्या संख्येवर अजून मर्यादा आलेली नाही. हीच बाब आरोग्य विभागासाठी अधिक चिंतेची आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूRatnagiriरत्नागिरी