शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

चिपळुणात कातकरी समाजाचे ‘बांधण’ धरणे सत्याग्रह आंदोलन

By संदीप बांद्रे | Updated: December 12, 2022 18:58 IST

चिपळूण : वाशिष्ठी नदीला सती येथे येऊन मिळणाऱ्या नदीजवळ असलेल्या पुलाच्या ठिकाणी सोमवारी (१२ डिसेंबर) दिवसभर आदिवासी आदिम कातकरी ...

चिपळूण : वाशिष्ठी नदीला सती येथे येऊन मिळणाऱ्या नदीजवळ असलेल्या पुलाच्या ठिकाणी सोमवारी (१२ डिसेंबर) दिवसभर आदिवासी आदिम कातकरी संघटना, श्रमिक सहयोग, राष्ट्र सेवा दल, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय संघटनांनी एकदिवसीय ‘बांधण’ धरणे सत्याग्रह आंदोलन केले. यावेळी ‘बांधण वाचवा, आदिवासी वाचवा’, ‘हक्काचे आमचे मासे, टाकू नका जेसीबीचे फासे’ अशा घोषणा दिल्या.मागील महिन्यात २१ नोव्हेंबर रोजी सती नदीमध्ये गाळ उपसा कार्यक्रमांतर्गत जलसंपदा विभागाचे जेसीबी उतरवण्यात आले. यामध्ये कातकरी समाजाचे चौदा बांधण उद्ध्वस्त केले गेले. हा एक बांधण तयार करायला २५ ते २७ हजार रुपये खर्च येतो. प्रत्यक्ष बांधण उद्ध्वस्त होत असताना उपस्थित कातकरी कुटुंबाने विनंती करूनही काम थांबवण्यात आले नव्हते.

उद्ध्वस्त केलेल्या ‘बांधण’ची नुकसान भरपाई देण्यात यावी, बांधण असलेल्या ठिकाणी सर्व्हेक्षण होऊन त्या ठिकाणांना संरक्षण मिळावे, गाळ उपसा कार्यक्रमापूर्वी स्वायत्त पर्यावरणीय संस्थेमार्फत नदीचा अभ्यास व्हावा व या अभ्यासामध्ये स्थानिक मासेमार आणि आदिवासी समाजाचे मत प्राधान्याने लक्षात घ्यावे अशा मागण्या करण्यात आल्या.यावेळी आदिवासी आदिम कातकरी संघटना तालुकाध्यक्ष संजय जगताप, संजय जाधव, तालुका सचिव महेश जाधव, जिल्हा सचिव चंद्रकांत जाधव, सुरेश पवार, विजया निकम, केतन निकम, सँच्युरी एशियाचे प्रकल्प समन्वयक मल्हार इंदुलकर, श्रमिक सहयोगचे राजन इंदुलकर, डीबीजे महाविद्यालयाचे प्रा. राम साळवी, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे सचिव धीरज वाटेकर, महेंद्रगिरी निसर्ग मित्रचे अध्यक्ष अनिकेत चोपडे उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी