शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Satara Bus Accident : अपघातग्रस्त गाडी चालवत असल्याचा प्रकाश सावंतदेसार्इंवर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 16:49 IST

आंबेनळी दुर्घटनेतून एकमेव बचावलेले प्रकाश सावंतदेसाई हेच अपघातग्रस्त गाडी चालवत असल्याचा संशय मृतांच्या नातेवाईकांना आज व्यक्त केला आहे. यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशीसाठी मुख्यमंत्री, रायगड जिल्हाधिकारी तसेच कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंना निवेदन पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देअपघातग्रस्त गाडी चालवत असल्याचा प्रकाश सावंतदेसार्इंवर आरोपमृतांच्या नातेवाईकांची चौकशीची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन

रत्नागिरी : आंबेनळी दुर्घटनेतून एकमेव बचावलेले प्रकाश सावंतदेसाई हेच अपघातग्रस्त गाडी चालवत असल्याचा संशय मृतांच्या नातेवाईकांना आज व्यक्त केला आहे. यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशीसाठी मुख्यमंत्री, रायगड जिल्हाधिकारी तसेच कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंना निवेदन पाठविण्यात आले आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण कृषी विद्यापीठाच्या ३0 कर्मचाऱ्यांचा आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता, या बस दुर्घटनेतील प्रकाश सावंत देसाई एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. मात्र , सावंतदेसाई यांचे वेगवेगळे वक्तव्य पाहता अपघातामागे संशयास्पद स्थिती असल्याचा आरोप, सामाजिक कार्यकर्ते संजय गुरव यांनी केला आहे.

हे अपघातग्रस्त वाहन सावंत देसाई स्वत:च चालवत असावेत असा आरोप करुन या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींना कठोर शासन करावे, अशी लेखी तक्रार मुख्यमंत्री, रायगडचे जिल्हाधिकारी आणि दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंकडे दिल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय गुरव यांनी दिली आहे.आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात बस झाडावर आदळल्याच्या खुणा आहेत. कोसळणाऱ्या बसमधून एखादी व्यक्ती बाहेर पडणे कठीण आहे, वेगाने दरीत कोसळणाऱ्या बसमधून क्षणार्धात सावंतदेसाई कसे काय बाहेर पडले, तसेच या ठिकाणी मदतकार्य करणाऱ्या ट्रेकर्सना जिथे दोरखंडाचा व इतर साधनांचा वापर करावा लागला, तिथे सावंतदेसाई कोणताही ओरखडा अंगावर न उठता केवळ हाताच्या सहाय्याने २00 ते २५0 फूट दरीतून वर कसा काय आला, दोन गाड्या सहज पास होतील, एवढा प्रशस्त रस्ता असताना बस दरीच्या कडेला कशी काय गेली, असा सवाल गुरव यांनी केला आहे.

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातRatnagiriरत्नागिरी